आमसभेत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:32 AM2018-03-19T00:32:35+5:302018-03-19T00:32:35+5:30

देवळा : येथे झालेल्या आमसभेत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता भाऊसाहेब वेताळ यांनी रोहित्र बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप मेशी येथील शाहू शिरसाठ या शेतकऱ्याने केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आमसभेत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर यांनीदेखील रोहित्र बदलण्यासाठी वीज कंपनीच्या जनमित्राने पैसे घेतल्याचे सांगितले.

Complaints of rain in the General Assembly | आमसभेत तक्रारींचा पाऊस

आमसभेत तक्रारींचा पाऊस

Next
ठळक मुद्देपैसे घेतल्याची तक्रारवीज कंपनीच्या सहायक अभियंत्यावर कारवाईचा ठराव

देवळा : येथे झालेल्या आमसभेत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता भाऊसाहेब वेताळ यांनी रोहित्र बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप मेशी येथील शाहू शिरसाठ या शेतकऱ्याने केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आमसभेत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर यांनीदेखील रोहित्र बदलण्यासाठी वीज कंपनीच्या जनमित्राने पैसे घेतल्याचे सांगितले. आमसभेत शेतकºयांनी तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर देवळा तालुका कृषी कार्यालयाचा निष्क्रिय कारभार उघडकीस आला.
देवळा शहरातील जुन्या तहसील कार्यालयात आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर, पंचायत समितीच्या सभापती केशरबाई आहिरे, उपसभापती सरला जाधव, बाजार समितीचे सभापती बापू देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सिरसाठ, नूतन अहेर, माजी जि.प. सदस्या उषा बच्छाव, पं.स. सदस्य पंकज निकम, धर्मा देवरे, कल्पना देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी महेश पाटील आदींसह तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व अनेक कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कृषी विभागाची तक्र ार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांविषयी तक्रारी करण्यात आल्या. स्व. डॉ. दौलतराव अहेर यांचा पुतळा शहरात उभारण्यात यावा असा ठराव यावेळी करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गंगाधर शिरसाठ, विजय पगार, राजेंद्र देवरे, उदयकुमार अहेर, आदीनाथ ठाकूर आदींनी तक्रारी केल्या. तालुका कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय गुंजाळ उपस्थित नसल्याने सूर्यवंशी यांनी शेतकºयांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी उमराणा, दहीवड येथे आरोग्य अधिकाºयांची पदे त्वरित भरण्याची मागणी केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी याबाबत त्यांना येणाºया अडचणी सभेपुढे मांडल्या. मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याने लोड वाढून वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, वीजचोरीला आळा घातला तर वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. पालेपवाड, सहायक पोलीस निरीक्षक मंगलसिंग पवार, सहनिबंधक संजय गिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवटे, वीज कंपनीचे योगेश मराठे, कैलास शिवदे, सा.बां. विभागाचे आर.आर. पाटील आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व नागरिक बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. दरम्यान सांगवी, ता. देवळा येथील सुदर्शन जाधव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन विभाग परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा खासदार चव्हाण, आमदार डॉ. अहेर, केदा अहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारीतालुक्याच्या ग्रामीण भागात अधिकारी वर्ग मुख्यालयी राहात नसल्यामुळे जनतेला वेळेवर सुविधा मिळत नसल्याची तक्रार आदीनाथ ठाकूर यांनी केली. हा अनुभव पंचायत समिती सभापतींंनादेखील आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अहेर यांनी प्रत्येक गावात कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी ठेवण्याचा निर्णय घेतला व तशा सूचना अधिकाºयांना दिल्या. देवळा लोहोणेर रस्त्यालगत वाढलेली काटेरी झाडे झुडपे काढण्याची मागणी पंकज अहिरराव यांनी केली. तीन आठवड्याच्या आत तालुक्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी झुडपे काढण्याचे आश्वासन आमदार अहेर यांनी दिले.आम जनता कामासाठी कार्यालयात आल्यावर अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांना आदराची वागणूक देऊन त्यांच्या कामाचा त्वरित निपटारा करावा, अन्यथा गय केली जाणार नाही. कर्जमाफी योजनेत एकही लाभार्थी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही .
- केदा अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष
अधिकाºयांना पैसे देऊ नका, कोणी पैसे मागत असेल तर त्याची तक्र ार करा. त्या अधिकाºयावर त्वरित कारवाई केली जाईल. वीज वितरण कंपनीबाबत येणाºया तक्र ारी पाहता शनिवारी वीज कंपनीच्या अधिकाºयांची स्वतंत्र बैठक घेणार आहे.
-डॉ. राहुल अहेर, आमदार, देवळा

Web Title: Complaints of rain in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.