‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:10 AM2018-12-23T01:10:27+5:302018-12-23T01:10:41+5:30
उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले
सातपूर : उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, या कर्मचाºयांनी शनिवारीच नेमून दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकाºयांनी दिली. नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनल तयार झाले असून, २१ जागांसाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्याच पॅनलला मतदान करण्याचे आवाहन करीत शनिवारी प्रचार थांबविला आहे. मल्टी शेड्यूल बँक असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि परराज्यातही बँकेच्या शाखा असून, मतदारही विखुरलेले आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागली.
अखेरच्या क्षणापर्यंत प्रचार
तीन्ही पॅनलने जाहिर प्रचार समाप्त केला असला तरी अखेरच्या क्षणापर्यंत मतदारापर्यंत पोहचण्याची धडपड सुरू असून दिवसभर सभासदांना कॉल सेंटर तसेच उमेदवारांनी मोबाईल वर दूरध्वनी करून मतदानाचे स्मरण करून दिले जात होते. सोशल मिडीयावरूनही जोरदार प्रचार सुरू होता. परीचीतांकडून तसेच विविध ज्ञातींच्या नेत्यांकडून देखील यंदा उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचे दिसून आले.