विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:47+5:302020-12-22T04:14:47+5:30

नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आढावा बैठक सोमवारी (दि. २१) राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत ...

Complete development of tourist places in the region | विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा

विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा

Next

नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आढावा बैठक सोमवारी (दि. २१) राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा पर्यटक अधिक प्रमाणात लाभ घेऊ शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र यासोबतच नंदुरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून तेथील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे पूर्ण करण्यात यावीत. विभागातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास करत असताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. कुठलेही काम अपूर्ण अवस्थेत ठेवू नये अथवा अंशत: पूर्ण करू नये, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदिप संख्ये आदी उपस्थित होते. बैठकीनंतर राज्यमंत्री तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच त्यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर या प्रत्यक्ष उपस्थित होत्या.

(फोटो २१ पर्यटन)

Web Title: Complete development of tourist places in the region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.