खोदलेला रस्ता दुरु स्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:20 PM2020-02-24T23:20:57+5:302020-02-25T00:25:01+5:30

खोदलेला रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी सायगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याकडे केली आहे.

Complete the excavated road | खोदलेला रस्ता दुरु स्त करा

सायगाव येथील रस्तादुरुस्तीचे निवेदन योगेश गाडेकर यांना देताना भानुदास उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, नीलेश कुळधर, भास्कर आव्हाड, गोरख दौंडे, अशोक मोरे, प्रकाश कोथमिरे आदी़

Next
ठळक मुद्देसायगाव : ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम विभागास साकडे

येवला : खोदलेला रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी सायगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याकडे केली आहे.
सायगाव ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट ग्रामपंचायत योजनेंतर्गत वाय-फाय केबल टाकण्यात आली. त्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदरसूल ते नगरसूल सीमेंट काँक्र ीट व डांबरीकरण केलेला पक्क्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. सायगाव व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुठलीही परवानगी न घेता व गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ते व्यवस्थित न बुजविल्यामुळे रस्त्यालगत नाली तयार होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. धूळ, माती व फुफाटा त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यालगत जिल्हा परिषदची शाळा असून, शाळेतील मुलांना धुळीचा त्रास होत असल्याने रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी. अन्यथा सायगाव तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद लोहकरे याच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक योगेश गाडेकर यांना निवेदन दिले. यावेळी भानुदास उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, नीलेश कुळधर, भास्कर आव्हाड, गोरख दौंडे, अशोक मोरे, प्रकाश कोथमिरे, दिलीप ढाकणे, लहानु भालेराव, नवनाथ उशीर, अण्णासाहेब निघोट, दिनेश खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Complete the excavated road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.