क्रिकेटसह चार मैदानांची कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:33+5:302021-02-05T05:49:33+5:30
सिन्नर : शिर्डी मार्गालगत मुसळगाव शिवारात ५० एकर क्षेत्रावर तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे ...
सिन्नर : शिर्डी मार्गालगत मुसळगाव शिवारात ५० एकर क्षेत्रावर तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामांची आढावा बैठक पार पडली. क्रिकेट, कबड्डी, खो-खो आणि व्हाॅलीबॉलचे मैदान आसन व्यवस्थेसह पूर्ण झाले असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिली. क्रिकेट पॅव्हेलियनचा पहिला व दुसरा मजला, प्रसाधनगृहे, संकुलाची संरक्षक भिंत आदी कामेही पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. के. पाटील, शाखा अभियंता डी. के. बोडके, वास्तुविशारद अश्फाक अबुजीवाला, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, मुसळगावचे ग्रामविकास अधिकारी पी. एस. बावीस्कर, विजय कोकाटे, अरुण भरीतकर आदी उपस्थित होते.
-----------
२०० मीटर रनिंग ट्रॅकचा बेस पूर्ण झाला आहे. तथापि, कोकाटे यांनी ४०० मीटर रनिंग ट्रॅकचा प्रस्ताव मांडल्याने तिथे हॉकीचे मैदान प्रस्तावित करण्यात आले. पॅव्हेलियनचा वरचा मजला, पोटमाळा, बाह्य आणि अंतर्गत विद्युतीकरण आदी कामांचा आमदार कोकाटे यांनी आढावा घेतला. पॅव्हेलियनच्या कामासाठी ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ट्रान्स्फॉर्मर उभारणीचा खर्च तालुका क्रीडा संकुल समितीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. हा प्रश्न निकाली लागला.
------------------
‘अतिक्रमणधारकांशी समन्वयाने तोडगा काढा’
तालुका क्रीडा संकुलाच्या हद्दीत काही अतिक्रमण झालेले आहे. तथापि, त्यांना घरकुले मंजूर करून द्यावीत. त्यांचे संसार उघड्यावर आणू नका, चर्चा करून समन्वयाने तोडगा काढावा, अशा सूचना कोकाटे यांनी तहसीलदार कोताडे यांना केल्या. तत्काळ कार्यवाही सुरू करणार असल्याचे कोताडे म्हणाले.
-------------------
सिन्नर येथे आढावा बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, ए. के. पाटील, डी. के. बोडके, अश्फाक अबुजीवाला, मधुकर मुरकुटे, पी. एम. बिब्बे आदी उपस्थित होते. (३० सिन्नर ३)
===Photopath===
300121\30nsk_11_30012021_13.jpg
===Caption===
३० सिन्नर ३