हरकतींवरील सुनावणी पूर्ण

By admin | Published: November 8, 2016 01:06 AM2016-11-08T01:06:48+5:302016-11-08T01:03:05+5:30

प्रारूप प्रगाग रचना : ३१ हरकतदार पालिकेत उपस्थित

Complete hearing on objections | हरकतींवरील सुनावणी पूर्ण

हरकतींवरील सुनावणी पूर्ण

Next

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींची सोमवारी (दि.७) राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी ३२ पैकी ३१ हरकतदारांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना आयोगाकडून घोषित केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना घोषित करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या असता ३२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर मंगळवारी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. यावेळी ३१ हरकतदारांनी हजेरी लावत आपली बाजू मांडली, तर एक हरकतदार अनुपस्थित राहिला. हरकतदारांनी बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज सोबत तैनात ठेवली होती. नगररचना विभागामार्फत प्रोजेक्टरमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची माहिती दीपक कपूर यांना करून दिली गेली. सुनावणीप्रसंगी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महसूल उपआयुक्त खिल्लारे, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त विजय पगार, नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल, कार्यकारी अभियंता संजय घुगे, मगर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)




 

Web Title: Complete hearing on objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.