मका खरेदी प्रक्रिया २९ पर्यंत पूर्ण करा : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:14+5:302021-01-25T04:16:14+5:30

पालकमंत्री भुजबळ येवला दौऱ्यावर असताना त्यांनी, येथील संपर्क कार्यालयात कोरोना, मका खरेदीसह प्रलंबित विकासकामांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागांच्या ...

Complete Maize Procurement Process by 29: Chhagan Bhujbal | मका खरेदी प्रक्रिया २९ पर्यंत पूर्ण करा : छगन भुजबळ

मका खरेदी प्रक्रिया २९ पर्यंत पूर्ण करा : छगन भुजबळ

Next

पालकमंत्री भुजबळ येवला दौऱ्यावर असताना त्यांनी, येथील संपर्क कार्यालयात कोरोना, मका खरेदीसह प्रलंबित विकासकामांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मका खरेदीसाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत मका खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रंदिवस खरेदी सुरू ठेऊन दि. २९ तारखेपर्यंत मका खरेदी पूर्ण करण्यात यावी, असे आदेश देत कोणत्याही शेतकऱ्यांची मका शिल्लक राहू नये, अशा सूचना भुजबळ यांनी केल्या.

येवला शहरात असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच येवला शहरातील विंचूर चौफुलीसह इतर वाहतूक बेटांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे तसेच शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्याही भुजबळ यांनी दिल्या. येवला शहरातील विस्थापित झालेल्या गाळेधारकांना नवीन इमारतीत ५० टक्के आरक्षण ठेऊन त्यांना प्राधान्याने गाळे देण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा तसेच येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून येत्या १५ दिवसांच्या आत उद‌्घाटन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे असे स्पष्ट करून, कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी यावेळी दिला.

बैठकीस तहसीलदार प्रमोद हिले, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, ‘महावितरण’ विभागाच्या उपअभियंता पिनल दुसाने, उमेश चौधरी, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख आदी उपस्थित होते.

===Photopath===

240121\24nsk_27_24012021_13.jpg

===Caption===

येवला येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत तहसीलदार प्रमोद हिले, नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर व अधिकारी.

Web Title: Complete Maize Procurement Process by 29: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.