सुळे उजव्या कालव्याचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:29 AM2019-02-10T00:29:14+5:302019-02-10T00:29:35+5:30

सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणुकांत आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी यांच्यासह पाटविहीर ग्रामस्थांनी दिला आहे.

Complete the right canal work | सुळे उजव्या कालव्याचे काम पूर्ण करा

सुळे उजव्या कालव्याचे काम पूर्ण करा

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : पाटविहीर गावाला दुष्काळाच्या झळा

कळवण : सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणुकांत आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी यांच्यासह पाटविहीर ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या राज्यासह कळवण तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण आहे. दुष्काळाच्या झळा तालुक्यातील पाटविहीर शिवाराला जास्त जाणवत आहेत. तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे उजव्या कालव्याचा शेवट पाटविहीर गावापासून कळवण शिवारातील गिरणा नदीच्या नकट्या बंधाऱ्यापर्यंत होतो. १२ वर्षांपासून पाटविहीर गावापर्यंत पाट व पाणी दोन्ही न पोहोचल्याने येथील शेती कोरडवाहूच राहिली आहे. पुनंद प्रकल्पाच्या सुळे उजव्या कालव्याचे २१ किमीचे काम २००५-०६ मध्ये २० कोटी ३६ रु पये खर्च करून करण्यात आले आहे. मात्र या कालव्याचे मातीकाम, कॉँक्रिटीकरण कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. कालव्याला पाणी वाहण्यासाठी योग्य चढ-उतार नसल्याने पाणी आतापर्यंत शून्य ते १६ किमीपर्यंत अत्यंत कमी दाबाने येत आहे. हा कालवा शून्य ते २१ किमीचा असून, १६ ते २१ किमीतील शेतकरी या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
उन्हाळ्यात आवर्तन सोडावे
पाटविहीर येथील नागरिकांची अडचण ओळखून तत्काळ अपूर्ण कालव्याचे काम पूर्ण करावे आणि याच वर्षी उन्हाळ्यात आवर्तन सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणूक काळात तालुक्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे व कळवण पंचायत समितीचे माजी सभापती बापू भोये, पाटविहीरचे सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी, ग्रामपंचायत सदस्य निर्मला भोये, सुरेश जगताप, हिराबाई बागुल, सुनंदा जगताप, शिवाजी चौरे, पोलीस पाटील, रामचंद्र भोये, वसंत बागुल यासह पाटविहीर ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Complete the right canal work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.