बारागावपिंप्रीसह सहा गाव पाणीपुरवठा योजना पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:13 AM2018-04-23T00:13:31+5:302018-04-23T00:13:31+5:30
सिन्नर तालुक्यातील गुळवंच, बारागावपिंप्रीसह सहा गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेत गुळवंच, निमगाव, हिवरगाव, केपावाडी, पाटपिंप्री व सुळेवाडी या गावांचा समावेश असून, ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच, बारागावपिंप्रीसह सहा गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेत गुळवंच, निमगाव, हिवरगाव, केपावाडी, पाटपिंप्री व सुळेवाडी या गावांचा समावेश असून, ऐन उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सुमारे ६ कोटी ५६ हजार रुपये खर्च करून ही योजना पूर्ण करण्यात आली आहे. हिवरगाव, निमगाव, गुळवंच, बारागावपिंप्री, पाटपिंप्री व सुळेवाडी या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहेत, तर केपानगर येथे जलशुद्धिकरण केंद्र व पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (दि. २१) आमदार राजाभाऊ वाजे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जीवन प्राधिकरणच्या सहायक अभियंता श्रीमती एम. एस. बॅनर्जी, शाखा अभियंता आर. एच. मिस्तरी, एस. आर. पवार यांनी पाहणी केली. यावेळी केशव कांगणे, बजुनाथ शिरसाठ, भगवान कांगणे, रामनाथ पावशे, राजेंद्र कातकाडे, सरपंच नारायण बोडके उपस्थित होते. निमगाव सिन्नर व पाटपिंप्री येथे आमदार वाजे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे वाजे यांनी आभार मानले.