बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:03 PM2018-10-01T18:03:37+5:302018-10-01T18:05:08+5:30
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.
सटाणा : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाकडून समाजातील गोरगरीब घटकांच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आॅनलाइन प्रणाली स्वीकारण्यात आली असून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आॅनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होत आहे.त्यामुळे साहजिकच गरजू लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली असून त्यांची दलालीपासून सुटका झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.डॉ.भामरे यांच्या हस्ते तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ.भामरे यांनी बागलाण तालुक्यासाठी आगामी काळात घरकुल उिद्दष्ट वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगून आपण त्या समतिीवर चेअरमन असल्याने तालुक्यासाठी अधिकाधिक घरकुले मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.यावेळी त्यांनी मोदी शासनाकडून गोरगरीब वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना आण िकार्यक्र मांची माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव,नेते डॉ. विलास बच्छाव, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पाटील आदींची भाषणे झाली.तालुका गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक करून मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली.कार्यक्र मासाठी प्रांताधिकारी प्रवीण महाजन,तहसीलदार प्रमोद हिले,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींसह डॉ.शेषराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे,कण्हू गायकवाड,साधना गवळी,लता बच्छाव,पंचायत समतिी सभापती विमल सोनवणे,उपसभापती शीतल कोर,सटाणा नगर पालिकेचे नगरसेवक,सटाणा व नामपूर बाजार समतिीचे संचालक व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.मेळाव्यासाठी तालुक्यातून आलेले शेकडो घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
भाजपा सरकारने केली दलाली बंद
कॉंग्रेस सरकारच्या काळात दिल्लीहून जर शंभर रु पये पाठविले तर गावापर्यंत केवळ दहा रु पये पोहचत होते.भाजप सरकारने यात कमालीच्या सुधारणा करत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची दलाली बंद केली असून प्रत्येक योजनेचा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करून पारदर्शक काम सुरु केले आहे.यापलीकडेही शासनाच्या योजनेसाठी जर कोणी अधिकारी किवा कर्मचारी लाभार्थ्याकडे पैशांची मागणी करत असेल तर थेट माङयाकडे तक्र ार करा असेही त्यांनी भरसभेत सांगितल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी टाळ्या वाजवून डॉ.भामरेंचे स्वागत केले.