रमजान उपवासांचे दोन खंड पूर्ण; पुढील खंडाला आरंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:14+5:302021-05-03T04:10:14+5:30

संयम, सदाचार व आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो. उपवासांचा महिना रमजानुल मुबारकचे तीन खंड मानले जातात. कृपा, क्षमा ...

Complete two volumes of Ramadan fasting; Begin the next volume | रमजान उपवासांचे दोन खंड पूर्ण; पुढील खंडाला आरंभ

रमजान उपवासांचे दोन खंड पूर्ण; पुढील खंडाला आरंभ

Next

संयम, सदाचार व आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो. उपवासांचा महिना रमजानुल मुबारकचे तीन खंड मानले जातात. कृपा, क्षमा व मोक्ष खंड अशी त्यांची नावे आहेत. पहिल्या दहा उपवासांत सर्वश्रेष्ठ अल्लाहतालाची उपवासधारकांवर विशेष कृपा लाभते. त्यामुळे पहिल्या दहा उपवासांच्या काळास 'कृपाखंड' असे संबोधले जाते. दुसऱ्या क्षमा खंडात उपवासधारकांच्या कळत-नकळत झालेल्या चुका व गुन्ह्यांना क्षमा करण्यात येते. त्यामुळे उपवासधारकांचा गुन्ह्यांचे ओझे कमी होऊन पुण्य कार्य वाढते. शेवटच्या व अंतिम दहा दिवसांत मोक्ष खंडात उपवासधारकांची सर्व मागील पुढील पापकार्य माफ करून अल्लाहताला नरकाचे दरवाजे बंद करून जन्नतमध्ये (स्वर्गात) जागा निश्चित करतो. तसेच शेवटचे दहा दिवस उपवास करणाऱ्यासाठी पुण्यदायक मानले जातात. रमजानमध्ये २६ व २७ व्या उपवासाची रात्र शब-ए-कद्र म्हणून साजरी करतात. त्यानिमित्त रात्रभर जागरण करून नमाजपठण, तस्बी (जप) व कुरण शरीफचे वाचन करून आराधना केली जाते.

त्यामुळे पवित्र ३० दिवसांच्या निर्जळी उपवासात प्रत्येकी दहा दिवसांचे खंड विभागले आहेत. दरवर्षी रमजान पर्वामध्ये मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी अल्पोपाहार घेऊन दिवसभर निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात. सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी फलाहार करून उपवास पूर्ण केला जातो. यावर्षी रमजान पर्वाला कडक उन्हाळ्यात प्रारंभ झाला असला तरी मुस्लीम बांधव मोठ्या भक्तिभावाने व निष्ठेने संपूर्ण महिन्याचे निर्जळी उपवास (रोजा) करतात.

इन्फो...

रमजान महिन्यात पाच वेळची नमाज बरोबर तराविहीची खास २० रकात नमाज दररोज पठण करण्यात येते. उपवास सुरू होण्याअगोदर चंद्रदर्शन झाल्याबरोबर या नमाजला आरंभ होतो, तर ईदच्या चंद्रदर्शनाने तराविहीची खास वीस रकात नमाज बंद केली जाते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मशिदीमध्ये नमाजपठणासाठी मज्जाव करण्यात आल्याने घरामध्येच नमाज तसेच पारंपरिक प्रथेप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहे.

Web Title: Complete two volumes of Ramadan fasting; Begin the next volume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.