निफाडला जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ९९ कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:06 AM2018-06-10T00:06:52+5:302018-06-10T00:06:52+5:30
निफाड : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निफाड तालुक्यातील ७ गावांत ९९ कामे पूर्ण झाली असून, ४० कामे प्रगतिपथावर आहेत.
निफाड : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निफाड तालुक्यातील ७ गावांत ९९ कामे पूर्ण झाली असून, ४० कामे प्रगतिपथावर आहेत.
तालुक्यातील चितेगाव, गोरठाण, पिंपळगाव नजिक , टाकळी विंचूर, पाचोरे वणी, मरळगोई खुर्द, अंतरवेली या ७ गावांत तालुका कृषी अधिकारी कार्यालय , लघुपाटबंधारे जि. प. उपविभाग निफाड, पंचायत समिती, उपअभियंता लघुसिंचन, उपविभाग चांदवड, येवला सामाजिक वनीकरण विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या सहा विभागांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. लोकसहभागातून काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा निफाडचे प्रांत महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व विभागाने ही कामे पूर्ण केली आहेत. या ७ गावांत जलस्तर वाढविण्यासाठी नाला खोलीकरण, केटीवेअर बंधारा दुरुस्ती, विहीर पुनर्भरण, सीमेंट नाला बांधातील गाळ काढणे, सीमेंट बांध दुरु स्ती आदी कामे हाती घेण्यात आली होती शासनाच्या वरील विविध विभागाच्या वतीने या ७ गावात ७० कामे पूर्ण करण्यात आली असून ३९ कामे प्रगतीपथावर आहेत तर लोकसहभागातू २९ कामे पूर्ण करण्यात आली. १ काम प्रगतीपथावर आहे.
लघुसिंचन विभागाच्या वतीने १३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ६ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतिपथावर आहेत. लघुपाटबंधारे जि. प. उपविभाग निफाडच्या वतीने या तालुक्यात २३ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील १८ कामे पूर्ण झाली असून ५ कामे प्रगतिपथावर आहेत. बंधारा दुरु स्तीच्या कामांमुळे वरील ७ गावातील सदर बंधाऱ्यात पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्याचा फायदा या गावांना होणार आहे.