झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 06:00 PM2018-12-29T18:00:19+5:302018-12-29T18:00:46+5:30
लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा, भारती पवार सरपंच ग्रा. पं. विठेवाडी, कल्पना निकम ग्रा. पं. सदस्या, विठेवाडी, संतोष शेळके, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समतिी झरिे पिंपळ, महेंद्र आहेर शालेय व्यवस्थापन समतिी सदस्य झरिेपिंपळ, एन. एन. सोनवणे, ग्रामसेवक विठेवाडी, उपस्थित होते
लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा, भारती पवार सरपंच ग्रा. पं. विठेवाडी, कल्पना निकम ग्रा. पं. सदस्या, विठेवाडी, संतोष शेळके, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समतिी झरिे पिंपळ, महेंद्र आहेर शालेय व्यवस्थापन समतिी सदस्य झरिेपिंपळ, एन. एन. सोनवणे, ग्रामसेवक विठेवाडी, उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा म्हणाल्या कि, शिक्षण क्षेत्रात पवित्र कार्य करणार्या, ज्ञानकुभांतील शिक्षण, संस्कार व मुल्यशिक्षणाची बिजे भावी पिढीतील कोवळ्या मनात पेरु न, सजग व सुसंस्कृत पिढी घडवण्याचे पवित्र कार्य शिक्षक अहोरात्र करत आहेत. सदर कार्यक्र मात ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे यांना जि. प. नाशिकतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याने कल्पना देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्या प्राधिकरण नाशिक यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे तासिका घेण्यात आल्या. देविदास शेवाळे यांनी तांत्रिक सत्रात इयत्ता ५ वी परिसर अभ्यास विषयी अध्ययन निष्पत्तीवर मानवी श्वसनसंस्था पाठाचा व्हिडीऔ दाखवून गटचर्चा व सादरिकरण केले. सुनिल आहेर यांनी शासन निर्णय बालरक्षक या विषयी सखोल मार्गदर्शन केले. रावबा मोरे केंद्र प्रमुख देवळा यांनी सामायिकरण व वैयिक्तक प्रतिबिंब या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमोद आहेर यांनी भाषा व गणति अध्ययन स्तर टप्पा ३ केंद्रातील शाळांचे विद्याप्राधिकरण नाशिक यांनी केलेले विश्लेषण व स्थिती वाचन केले. देविदास शेवाळे यांनी संकलित चाचणी १ चे इयत्ता १ ली ते ७ वी या वर्गांचे झरिेपिंपळ शाळेची पी. पी. टी तयार करु न अ. ब. क. ड. श्रेणीनुसार डाटा विश्लेषण व सादरीकरण केले. व शिक्षण परिषदेची अभिप्राय लिंक भरणे या विषयी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद कार्यक्र माचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार देविदास शेवाळे यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्याठी अनुपमा देवरे मुख्याध्यापिका, वैशाली बच्छाव, अरु णा आहेर. नितीन पवार यांनी परिश्रम केले.