मतदानयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:04 AM2019-10-04T01:04:46+5:302019-10-04T01:05:05+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

Completed the process of voting machines | मतदानयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

मतदानयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Next
ठळक मुद्देकेंद्रीय वखार महामंडळाच्या वेअर हाउसमध्ये सदर प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या वेअर हाउसमध्ये सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मतदानयंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, उपायुक्त महानगरपालिका, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस यामध्ये सर्व प्रकारच्या इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. सदर प्रणाली ही अत्यंत अचूक व पारदर्शक तत्त्वावर निर्माण करण्यात आली असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे २० व ३० टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदार-संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत. संगणकीयप्रणालीच्या साह्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण करण्यात आल्याची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली. सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्राचे वाटप होणार असून, व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्योचही सांगितले. विधानसभा मतदारसंघ-निहाय १५ मतदारसंघात ४५७९ मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५०१ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६१ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.  यावेळी जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार व निवडणूकप्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Completed the process of voting machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.