मनपा आयुक्तांकडून गटनेत्यांची मनधरणी

By Admin | Published: December 14, 2015 12:07 AM2015-12-14T00:07:31+5:302015-12-14T00:08:25+5:30

सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक : आयुक्तांनी मांडली भूमिका, विरोधाचा सूर मात्र कायम; आज अंतिम निर्णय

Compliment of group leaders by Municipal Commissioner | मनपा आयुक्तांकडून गटनेत्यांची मनधरणी

मनपा आयुक्तांकडून गटनेत्यांची मनधरणी

googlenewsNext

नाशिक : सर्वपक्षीय गटनेत्यांनी एसपीव्हीला मान्यता देऊन तसा ठराव महासभेने करून द्यावा यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व गटनेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत मनधरणी नाट्य सुरू होते. १५ डिसेंबरपर्यंत शासनाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने उद्या सोमवार दि. १४ रोजी गटनेते आपली भूमिका लेखी स्वरूपात आयुक्तांना सादर करणार असल्याचे समजते.
नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर महापौरांनी महासभेच्या निर्णयात कोणताही बदल न करता ‘करवाढ’ आणि ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) वगळून प्रस्ताव प्रशासनाला रवाना केला आहे. ‘एसपीव्ही’वगळून प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आल्याने दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेत नाशिकचा टिकाव लागण्याची शक्यता मावळली आहेच शिवाय १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव राज्य शासनाला सादर करावयाचा असल्याने ‘एसपीव्ही’ मंजुरीसाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
गेल्या २ डिसेंबर रोजी विशेष महासभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील करवाढ आणि ‘एसपीव्ही’ला सदस्यांनी विरोध दर्शविला होता. भाजपाच्या सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित ‘एसपीव्ही’बद्दल भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. आजही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवरच घाला येणार असल्याची भीती व्यक्त करत त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर सभागृहानेही बग्गा यांच्या सुरात सूर मिसळून कंपनीकरणाचा प्रस्ताव झुगारून लावला होता.

Web Title: Compliment of group leaders by Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.