कळवणला भरदिवसा घरफोड्या; लाखोंचा ऐवज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:05 AM2018-05-13T01:05:59+5:302018-05-13T01:05:59+5:30

१२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

Compliment of rumor; Millions of dollars missing | कळवणला भरदिवसा घरफोड्या; लाखोंचा ऐवज गायब

कळवणला भरदिवसा घरफोड्या; लाखोंचा ऐवज गायब

Next

कळवण : १२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.  शहरातील वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून  भरदिवसा दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास धाडसी चोऱ्या झाल्या. त्यामुळे  शहरातील नागरिकांमध्ये खळबळ  उडाली असून, भीतीचे वातावरण  पसरले आहे. रात्री उशिरा श्वान  पथकाला पाचारण करण्यात आल्याने उशिरा  गुन्हा दाखल झाला . कसमादे पट्ट्यात 12 मे लग्नाची शेवटची तिथी असल्याने शहरात व कॉलनी परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेऊन चोरटयांनी आपला मोर्चा कळवण शहरातील गणेशनगर भागातील रेणुका कॉलनीतील कळवण पंचायत समतिीचे गटविकासधिकारी डी एम बिहरम, शिवनेरी कॉलनीतील भरत पाटील, ग्रामसेवक पवार हे संपूर्ण कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. चप्पल बुटाचे व्यापारी गोविंद पंढरीनाथ मालपुरे हे आपल्या व्यापारी प्रतिष्ठानात गेले होते. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यामुळे काही नागरिक घरात झोपले असल्याचा फायदा घेत सर्वांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून भरिदवसा धाडसी चोर्या केल्या आहेत.  या चोरीत लाखो रु पयांचा मुद्देमाल गेल्याने व दिवसा चोर्या झाल्याने कळवण शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीचा तपास लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशीराने श्वान पथक दाखल झालेल्या रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या चोर्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला, विनोद जाधोर, पोलीस कर्मचारी करीत आहेत.
 

Web Title: Compliment of rumor; Millions of dollars missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.