शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:18 AM2019-03-12T00:18:53+5:302019-03-12T00:19:10+5:30

कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच साहित्यिकाच्या आठवणींना उजाळा देतानाच यशंवतराव चव्हाणांविषयी किस्स्यांनी निवेदक मिलिंद कुलकर्णी यांच्यासोबत कला व साहित्य रसिकांच्या गप्पा रंगल्या.

 Complimentary talkie with vocabulary | शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल

शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल

Next

नाशिक : कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच साहित्यिकाच्या आठवणींना उजाळा देतानाच यशंवतराव चव्हाणांविषयी किस्स्यांनी निवेदक मिलिंद कुलकर्णी यांच्यासोबत कला व साहित्य रसिकांच्या गप्पा रंगल्या.
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातसोमवारी (दि.११) दिलखुलास-मैफीली मिलिंद कुलकर्णी यांनी यशंवतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत, समाजकारणाची दिशा दिल्याचे मत व्यक्त केले. कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी चव्हाण यांनी मोठे योगदान दिले असून त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांची जोपासना असल्याचे सागितले़ त्यांनी शांता शेळके, सुधीर मोघे, वैभव जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, यांच्या कलाकर्तुत्वाच्या आठवणींना उजाळा देत कवितांचे सादरीकरण करीत मैफलीत रंगत भरली. प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले. यावेळी डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. मनोज शिंपी, ज्योत्स्ना कुलकर्णी व विवेक केळकर, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डी. जी. हंसवाणी आदी रसिक उपस्थित होते.
कवी, कलावंत, साहित्यिकांनी आपल्या विलक्षण आविष्काराने रसिकांना अनेकांचे जीवन समृद्ध केल्याचे सांगतानाच ग. दि. मांडगुळकरांनी काव्य, गीतांतून जीवनगाणे जगासमोर आणले. गुलजारांनी कवितेतून सामान्य माणसाची अस्वस्थता आपल्या गीतांतून संवेदनशीलतेने रेखाटली. विं. दा. करंदीकर, पु. ल. देशपांडे, कवी बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर यांनी आपल्या लेखनातून गावाकडचे जग, चालीरिती विविध शब्दांतून मनावर रेंगाळत ठेवण्याचे काम केल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

Web Title:  Complimentary talkie with vocabulary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.