पंचवटीत ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:05+5:302020-12-09T04:11:05+5:30

पंचवटी : केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुकारण्यात ...

Composite response to 'Bharat Bandh' in Panchavati | पंचवटीत ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

पंचवटीत ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

Next

पंचवटी : केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पंचवटीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधीने शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्यांना बंधमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला व्यापऱ्यांनीही प्रतिसाद देत काही काळ दुकाने व व्यवसाय बंद ठेवले.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला बाजार समिती आवारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी उर्वरित पंचवटी परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. निमाणी बसस्थानकातून शहरात बससेवा सुरळीतपणे सुरू होती. मात्र प्रवासी संख्या कमी प्रमाणात असल्याने बसफेऱ्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले, तर परिसरातील जीवनावश्यक वस्तू दुकाने सुरळीतपणे चालू असल्याचे दिसून आले, तर काही व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती.

-------------------------------------------

Web Title: Composite response to 'Bharat Bandh' in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.