मालेगावी बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:20 PM2020-01-08T23:20:22+5:302020-01-08T23:20:49+5:30
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मालेगाव : केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शहरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर विविध कामगार संघटनांनी धरणे आंदोलन पुकारले होते. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत, तहसील, राष्टÑीयीकृत बँका, सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, अंगणवाडीसेविका, वीज वितरण कर्मचारी, टीडीएफ शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, सरकारी व निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समिती, महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटना, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या संघटनांनी संपात सहभाग घेतल्याने शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. राजपत्रित अधिकारीवगळता शासकीय कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता, तर अत्यावश्यक सेवा असलेली कार्यालये सुरू होती. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार कमी करून महागाईवर नियंत्रण आणावे. कामगार कायद्यातील कामगारविरोधी व मालकधार्जीने कायदे मागे घ्यावेत. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. असंघटित कामगारांसह शेतकरी, शेतमजुरांना १० हजार रुपये सेवानिवृत्ती भत्ता द्यावा, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, कामगारांना समान वेतन आयोग लागू करावा, वीज कंपनीतील रिक्त जागा भराव्यात, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक कर्मचाºयांना वेतन अनुदानाचे टप्पे मंजूर करावेत, अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय दर्जा द्यावा, सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसह संघटनांनी धरणे आंदोलन केले होते. संपात अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील चार, प्रांत कार्यालयातील १, तहसील कार्यालयातील ८१ कर्मचारी सहभागी झाले. यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. शिक्षक समन्वय समितीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर, तर आयटक, नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी व महिला तक्रार निवारण संघटनेने, महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले, तर महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू होते. काही कर्मचारी संपाला पाठिंबा दिला होता तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनेही या संपाला पाठिंबा दिला होता.
आंदोलनात शिक्षक समन्वय समितीचे आर.डी. निकम, फिरोज बादशाह, एस.के. बोरसे, रवींद्र शेवाळे, आर. आर. सैंदाणे, एस. आय. निकम. के.वाय. अहिरे, आयटकचे तालुकाध्यक्ष सुनीता कुलकर्णी, मंगला मिसर, लीला गांगुर्डे, दादाजी गोसावी, कॉ. प्रा. के.एन. अहिरे, इलेक्ट्रीक फेडरेशनचे वाघ, मुर्तुझा अन्सारी, अंगणवाडी संघटनेच्या जुलेखा जमील अहमद, आसमा मो. युसुफ, खैरून्नीसा सिराज, मनीषा अहिरे, मंगल केदारे, शाहीन शेख फय्याज, भारत बेद, दिलीप जेधे, दयाराम रिपोटे, दीपक यशोद, अजय चांगरे यांच्यासह आशा गटप्रवर्तक संघटना, महाराष्टÑ राज्य ग्रामरोजगार संघटना, नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ, ईपीएस पेन्शनधारक ९५ पेन्शनधारक संघटना, रोजगार हमी योजना कर्मचारी संघटना, महाराष्टÑ राज्य बांधकाम कामगार संघटना, वीज वर्कर्स फेडरेशन, नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन, शेतमजूर संघटना, किसान सभा आदी संघटनांच्या पदाधिकाºयांनी संपात सहभाग घेऊन कामकाज बंद ठेवले होते.
जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी शिक्षक संपावर
दाभाडी : मालेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी देशव्यापी संपात सहभाग नोंदवला. तालुक्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन तहसीलदार चंद्रजीत राजपूत, सहायक गटविकास अधिकारी शरद कासार, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय ६० करावे, महिला कर्मचाºयांना बालसंगोपनासाठी दोन वर्षांची रजा मजूर करावी, रिक्त पदे तात्काळ भरावीत आदी मागण्यांचा समावेश आहे. संपात महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, पदवीधर केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक भारती या प्रमुख संघटनांनी सहभाग नोंदविला. यावेळी पेन्शन संघटनेचे नितीन शिंदे, सुमित बच्छाव, राजेंद्र खैरनार, किरण फुलपगारे, श्याम ठाकरे, शिक्षक समितीचे भाऊसाहेब पवार, जिभाऊ बच्छाव, चंद्रभान पवार, विजय अहिरे, किशोर खैरनार, पदवीधर संघटनेचे विश्वास निकम, भाऊसाहेब सोनवणे, अपंग कर्मचारी संघटनेचे सुभाष वाघ, विजय पिंगळे यांसह प्रदीप सूर्यवंशी, पंकज पाटील, शिवदास निकम, सुनील ठाकरे, विकास काथेपुरी, आदेश जवणे, प्रशांत कुलकर्णी, अभिजित देसले, परेश बडगुजर, विष्णू घुमाडे, देव भारती, दिनेश भुसे, भारत उशील, राजेंद्र पाटील, विशाल मिसर, योगेश पाटील आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.