हॉटेल्समध्येच बनवा कचºयापासून कंपोस्ट स्वच्छ सर्वेक्षण : मोठ्या हॉटेल्सला महापालिकेचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:52 AM2017-11-10T00:52:34+5:302017-11-10T00:53:52+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा कोणत्याही स्थितीत पहिल्या दहा क्रमांकांत यायचेच, या ईर्षेने महापालिका पेटली असून, आवश्यक गुणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया १४६ हॉटेल्सला त्यांच्याच जागांमध्ये कंपोस्ट खत निर्माण करण्याची सूचना महापालिकेने केली असून, तसे पत्र दिले जात आहे. पेट्रोलपंपचालकांना शौचालये सार्वजनिक करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर आता महापालिकेने बड्या हॉटेल्सकडे लक्ष केंद्रित केले आहे.

Compost Clean Surveys from hotels: Make a big survey of municipal corporation | हॉटेल्समध्येच बनवा कचºयापासून कंपोस्ट स्वच्छ सर्वेक्षण : मोठ्या हॉटेल्सला महापालिकेचे पत्र

हॉटेल्समध्येच बनवा कचºयापासून कंपोस्ट स्वच्छ सर्वेक्षण : मोठ्या हॉटेल्सला महापालिकेचे पत्र

Next
ठळक मुद्देजानेवारी-फेबु्रवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण महापालिकाकसून कामाला लागलीकचरा आपल्या जागेवरच साठवून खताची निर्मिती

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा कोणत्याही स्थितीत पहिल्या दहा क्रमांकांत यायचेच, या ईर्षेने महापालिका पेटली असून, आवश्यक गुणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया १४६ हॉटेल्सला त्यांच्याच जागांमध्ये कंपोस्ट खत निर्माण करण्याची सूचना महापालिकेने केली असून, तसे पत्र दिले जात आहे. पेट्रोलपंपचालकांना शौचालये सार्वजनिक करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर आता महापालिकेने बड्या हॉटेल्सकडे लक्ष केंद्रित केले आहे.
जानेवारी-फेबु्रवारी २०१८ मध्ये केंद्र सरकारमार्फत स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. मागील वर्षी महापालिकेचा ५०० शहरांमध्ये १५१वा क्रमांक आला होता. यंदा, स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक पहिल्या दहामध्ये यावा, अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानंतर महापालिका त्यादृष्टीने कसून कामाला लागली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत वेगवेगळ्या उपक्रमांसाठी गुणांकन आहे. त्यात, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया हॉटेल्सने त्यांच्याच जागांवर कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती केल्यास त्यासाठी २२ गुण आहेत. महापालिकेने त्यानुसार, माहिती संकलित केल्यानंतर शहरात १४६ मध्ये दररोज शंभर किलोपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या हॉटेल्सने निर्माण होणारा कचरा आपल्या जागेवरच साठवून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करावी, असे प्रयोजन आहे. महापालिकेकडून संबंधित हॉटेल्सचालकांना पत्र दिले जाणार असून, त्यांना कंपोस्ट खतनिर्मितीबाबत प्रोत्साहित केले जाणार आहे. मात्र, हॉटेल्समध्ये कंपोस्टसाठी जागा उपलब्ध होणे अवघड असल्याची प्रतिक्रिया चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Compost Clean Surveys from hotels: Make a big survey of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.