सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:50 AM2019-07-10T00:50:27+5:302019-07-10T00:51:16+5:30

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.

A comprehensive and supportive Pandari winner | सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

googlenewsNext
ठळक मुद्देखरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर

प्रा. डॉ. यशवंतराव पाटील

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.
या वारीला खूप मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्टÑात अशी अनेक घराणी, कुटुंबे, परिवार व व्यक्ती आहेत की ज्यांना ‘पंढरीच्या आषाढी वारीचे’ एक-दोन महिने अगोदरच वेध लागलेले असतात. वेगवेगळ्या संत-महंतांच्या सत्पुरुषांच्या लहान-मोठ्या हजारो दिंड्या त्यांच्या स्री-पुरुष वारकऱ्यांसमवेत सामील होतात. या सामीलकीचा आगळावेगळा भक्तिभाव त्यांच्या चेहºयावर दिसत असतो.
‘दिंड्या चालल्या-चालल्या, विठ्ठलाच्या दर्शनाला।।
घुमे गजर हरिनामाचा, भक्त हरिनामात रंगला ।।
टिळा वैष्णव हे ल्याले । गळा हार तुळशीमाळ ।।
एक तारी देते साथ । टाळ-मृदंगाच्या ताला ।।’ असे दिसून येते.
आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र अशा चार वाºया वर्षभर सुरू असतात. मात्र आषाढी वारी ही सर्वांत मोठी असते. सर्वच स्तरातून या वारीची विशेष दखल घेतली जाते. लाखो वैष्णवांची मांदियाळी विठ्ठल भावभक्तीने मजल दरमजल करीत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शन-भेटीच्या ओढीने पुढे सरकत असते. वारीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ‘सम-सकला पाहू’ आणि ‘भेदा भेद भ्रम अमंगळ’ हे वारीतल्या सर्व वारकऱ्यांचे आचार विचार सूत्र असते. हेच फार कौतुकाचे आहे. वारीत सामील न होणाºयांनाही कौतुक करायला व अचंबित होण्यास लावणारे आहे. सर्व जाती-धर्म, पंथ-गोत्रांचे वैष्णव विठ्ठलभक्तीने अभिमंत्रित होऊन विठ्ठलनामाचा गजर करीत असतात. यातूनच त्यांच्यातील काम, क्रोध, राग, लोभ, मोह, माया यांसारख्या षड्रिपूंचा निचरा होत असतो. यातून वारकºयांना आंतरिक शुद्धता आणि समाधान लाभते. पंढरीच्या आषाढी वारीबद्दल बरंच काही वाचण्यात, ऐकण्यात पाहण्यात येते. या संबंधात वर्तमानपत्रातही वारीसंबंधी लेखनाचा महापूर दिसतो. दूरदर्शनवर बरीच दृश्ये दिसतात; पण खरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर किमान वारीसमवेत काही अंतर पायी चालण्यातून मिळत असतो. ‘एक मेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ हा मनोभाव मनात साठवून प्रत्येक वारकºयाचा आचार-विचार, धर्म वारीत लहान-सहान प्रसंगातून पहायला मिळतो. सामील झालेल्यांना प्रत्यक्ष अनुभवास येतो. विठ्ठलाच्या भावभक्तीतून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळावरच वारीतील वारकरी पाऊस, वादळ, वारा, अडचणीचे अडवळणाचे घाट, अरुंद, गैरसोयीचे रस्ते... आदी कशाचीही पर्वा न करता आनंदविभोर अवस्थेत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे कूच करीत असतात. जसजसे पंढरपूर जवळ येते, तसतसे वारकºयांच्या हालचाली अधिकाधिक गतिमान आणि उत्साही होत जातात. मुखी विठुरायाचा गजर, काहींच्या हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ-मृदंग, कपाळी अष्टगंध व बुक्का... सारेच विलोभनीय! भक्तिभावाची श्रीमंती
दर्शविणारे असते. कुणी बेभान होऊन नाचत, कुणी फुगड्या घालत, कुणी टाळ-मृदंगाच्या तालात आणि सुरात भजन म्हणतात. प्रचंड गर्दीत सहभागी झालेल्या लाखो साधकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन होईल का नाही, हा प्रश्न वारीत सामील न झालेल्यांचा असतो. ज्या विठुरायाच्या भावभक्तीने आणि त्याच्या दर्शनाच्या ओढीने अभिमंत्रित झालेल्यांना हा प्रश्नच पडत नाही. जसजसे पंढरपूर वारकºयांचे माहेर सुखाचा स्वर्ग जवळ जवळ येतो, तसतसा त्यांच्या मनात भाव निर्माण होतो.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Web Title: A comprehensive and supportive Pandari winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.