संगणकीय सातबाºयाला सर्व्हरचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:32 AM2017-08-10T00:32:08+5:302017-08-10T00:33:57+5:30

तेरा गावांचे अद्ययावतीकरण : १९०० गावांना प्रतीक्षा नाशिक : स्वातंत्र्य दिनापासून खातेदारांना आॅनलाइन प्रणालीने संगणकीय सातबारा देण्याचा राज्यव्यापी शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील तफावत दूर करणारे ‘रि-इडिट’ सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जेमतेम १३ गावांमध्येच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले आहे.

 The compromise of the computer system | संगणकीय सातबाºयाला सर्व्हरचा अडसर

संगणकीय सातबाºयाला सर्व्हरचा अडसर

Next

तेरा गावांचे अद्ययावतीकरण : १९०० गावांना प्रतीक्षा
नाशिक : स्वातंत्र्य दिनापासून खातेदारांना आॅनलाइन प्रणालीने संगणकीय सातबारा देण्याचा राज्यव्यापी शुभारंभ केला जात असताना दुसरीकडे हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील तफावत दूर करणारे ‘रि-इडिट’ सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने जिल्ह्यातील जेमतेम १३ गावांमध्येच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. डिजिटल इंडिया या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमान्वये ई-सेवा प्रणालीद्वारे नागरिकांना अधिकाधिक शासकीय सेवा देण्याचा भाग म्हणून शासनाने खातेदारांना संगणकीय सातबारा उतारा देण्याचे ठरविले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या संदर्भातील काम सुरू असून, त्यासाठी गावोगावच्या तलाठ्यांना लॅपटॉप, इंटरनेटची जोडणीदेखील उपलब्ध करून देण्यात आली. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महसूल दप्तरात हस्तलिखितच नोंदणी केली जात असल्याने जुने व जीर्ण झालेल्या दप्तराच्या नोंदी अद्ययावत करण्याचे अवघड काम कसेबसे पूर्ण करण्यात आले आहे.
हस्तलिखित सातबारा उताºयाची संगणक प्रत तयार करण्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आलेले असले तरी, हस्तलिखित सातबारा उताºयावरील नोंदी व संगणकातील नोंदींची अचूकता तपासण्यासाठी शासनाने एडिट मॉड्यूल या सॉफ्टवेअरचा आधार घेतला. तलाठ्याने तयार केलेला सातबारा या एडिट मॉड्यूलच्या आधारे मंडल अधिकाºयाने तपासून तो योग्य असल्याचे नमूद केले. गेल्या महिन्यात तयार झालेल्या सातबारा उताºयाचे गावोगावी तलाठ्यांमार्फत चावडी वाचन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने सातबारा उताºयावरील नावे, जागेचा आकार, इतर हक्कात असलेली नोंद, पीक पाहणी आदी बाबींबाबत खातेदारांना अवगत करण्यात आले, त्यासाठी हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा उतारा पाहणीसाठीही खुला करण्यात आला. या चावडी वाचनानंतर खातेदारांच्या सूचना व हरकतींची दखल घेऊन सातबारा उतारा बिनचूक करण्यासाठी ‘रि-इडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. तथापि, गेले काही दिवस हे सॉफ्टवेअर चालेनासे झाल्याने तलाठ्यांचाही उपाय खुंटला.
नाशिक जिल्ह्यात १९०६ महसूली गावे असून, त्यातील सहा गावे सोडल्यास १९०० गावांमध्ये चावडीवाचन करण्यात येऊन सातबारा उताºयाच्या दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या. त्याची दुरुस्ती केली जात असताना ‘रि-इडिट’च्या सॉफ्टवेअरला सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने बुधवार अखेर फक्त १३ गावांचेच सातबारा उतारे अद्ययावतीकरण करण्यात आले आहेत. या गावांचे सातबारा उतारे आॅनलाइन प्रणालीने अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, शासनाने व प्रशासनानेही स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन उतारे देण्याच्या केलेल्या घोषणेची पूर्तता कशी होणार, हा प्रश्न कायम आहे.काम अपुरे, पण सत्काराची घाईसंगणकीय सातबारा उतारा अद्ययावतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नाशिक विभागात उत्कृष्ट काम करणारे तलाठी, मंडल अधिकाºयांचा १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री, विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्याचे घाटत आहे. त्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाºयांकडून नावे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी आॅनलाइन प्रणालीने खातेदारांना संगणकीय सातबारा उताºयाचे वितरणही करण्यात येणार आहे.

Web Title:  The compromise of the computer system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.