येवला लोकन्यायालयात ६२८५ प्रकरणांत तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 12:37 AM2022-05-09T00:37:25+5:302022-05-09T00:38:32+5:30

येवला : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक व तालुका विधी सेवा समिती येवला यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात ...

Compromise in 6285 cases in Yeola Lok Sabha | येवला लोकन्यायालयात ६२८५ प्रकरणांत तडजोड

येवला लोकन्यायालयात ६२८५ प्रकरणांत तडजोड

Next
ठळक मुद्दे ४२ लाख १८ हजार २०२ रुपयांचा महसूल वसूल झाला.

येवला : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक व तालुका विधी सेवा समिती येवला यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दाखलपूर्व ५,६१५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर प्रलंबित ६७० न्यायप्रविष्ट प्रकरणे होती. त्यापैकी प्रलंबित न्यायप्रविष्ट २८ प्रकरणे यशस्वीरित्या तडजोड झाली. तसेच २९३ दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड झाली. न्यायप्रविष्ट व वादपूर्व अशा एकूण ६ हजार २८५ प्रकरणांपैकी ३२१ प्रकरणांत यशस्वी तडजोड होऊन त्यात ४२ लाख १८ हजार २०२ रुपयांचा महसूल वसूल झाला.
येवला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय लोकन्यायालय झाले. यात दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. कांबळे, सह दिवाणी न्यायाधीश ए.पी. खोल्लम व दोन समितीद्वारे लोकन्यायालयाच्या कामकाजास प्रारंभ झाला. यामध्ये लोकन्यायालयासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या ६७० प्रकरणांपैकी २८ प्रकरणात यशस्वी तडजोड झाली. त्यातून २३ लाख ४४ हजार ८१४ रुपयांची रक्कम वसूल झाली. त्याचबरोबर विविध बँका, पतसंस्था, वीज वितरण, विमा कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था यांची वादपूर्व प्रकरणांपैकी प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन १८ लाख ७३ हजार ३८८ रुपयांची वसुली झाली. लोकन्यायालयाचे कामकाज यशस्वी करण्यासाठी येवला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. कदम, उपाध्यक्ष ॲड. आर. एस. तिवारी, ॲड.. बी. पी. पाटील, ॲड. आर. डब्ल्यू. गायकवाड व ज्येष्ठ विधिज्ञ, सहायक सहकारी अभियोक्ता ए. एस. वैष्णव, येवला न्यायालयाचे कार्यालयीन सहा. अधीक्षक डी. वाय. झनकर, वरिष्ठ लिपिक व्ही. सी. राव, लिपिक एस. एम. नागरे उपस्थित होते.

Web Title: Compromise in 6285 cases in Yeola Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.