गॅस कनेक्शनची सक्ती करणे अव्यवहार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:10 AM2018-02-28T01:10:20+5:302018-02-28T01:10:20+5:30
नाशिक : शासनाच्या धोरणानुसार शाळांना बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जात असतानाही शाळांना खिचडी शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सक्ती केली जात आहे.
नाशिक : शासनाच्या धोरणानुसार शाळांना बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जात असतानाही शाळांना खिचडी शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सक्ती केली जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, शासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्टÑ राज्य खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघाने केली आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहाराची कामे महिला बचतगटांना देण्यात आलेली आहेत. त्यामुळे शाळांना रोज या बचतगटांच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जातो. असे असतानाही शाळांना गॅस जोडणी घेण्याची सक्ती करणे चुकीचे असून त्यामुळे शासनाच्या पोषण आहार योजनेबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक शाळांना गॅस जोडणी बंधनकारक संयुक्तिक नसून गॅस जोडणीचे करायचे काय, असा प्रश्न महासंघाने उपस्थित केला आहे. मात्र त्याकडे लक्ष न देता गॅस जोडणीची सक्ती अव्यवहार्य असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात बºयाच शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील महासंघाने केली आहे. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे, कार्याध्यक्ष रमेश अहिरे, सचिव सुनील बिरारी, कोषाध्यक्ष दादाजी अहेर, जिल्हा संघटक अविनाश साळुंके आदी उपस्थित होते.