युरियासोबतच इतर खते घेण्याची सक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:35 PM2020-08-23T22:35:04+5:302020-08-24T00:13:08+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, भरवीर परिसरात खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन युरियासह इतर दुसरे खतदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार परिसरातील कृषिसेवा केंद्रांकडून होत असल्याने सरसकट लूट केली जात असल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, भरवीर परिसरात खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन युरियासह इतर दुसरे खतदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार परिसरातील कृषिसेवा केंद्रांकडून होत असल्याने सरसकट लूट केली जात असल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कृषिसेवा केंद्र बदलले, खतांचे दरही बदलत असल्याने संबंधित विभागाने यावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कृ षी विभागाने लक्ष देण्याची मागणीतालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस असल्याने शेतशिवार फुलले आहे. मागील कित्येक दिवसांपासून पिकांना युरियाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने शेतकºयांकडून मागणी वाढत आहे; परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तालुक्याच्या विविध भागात खताचा तुटवडा जाणवत आहे. खताची मागणी करणाºया शेतकºयांना युरिया नसल्याचे कृषिसेवा केंद्रांकडून सांगितले जाते. मात्र विनंती केल्यास युरिया पाहिजे असेल, तर पोटॅश, पॅमेशिअम आणि तणनाशके घेण्याची सक्ती केली जाते.
गरज नसताना शेतकºयांना युरियासोबत इतर खते घ्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.इगतपुरी तालुक्यातील अनेक कृषिसेवा केंद्रांसमोरील दरफलकही गायब झाले आहेत. कोणत्या बियाणांची किती किंमत आहे, कृषी केंद्रामध्ये औषधे, बियाणे, खते यांचा किती साठा आहे याची माहिती देणारा फलक केंद्रात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे; मात्र बोटावर मोजता येतील एवढ्याच दुकानांत फलक आहेत. बाकी सर्वच केंद्रांतील फलक गायब झाले आहेत. त्यामुळे बियाणांचे, खताचे दर माहीत नसल्याने शेतकºयांच्या खिशाला झळ बसत आहे. दरफलक नसलेल्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची गरज आहे.
- संतोष निसरड,
शेतकरी संघटना, कवडदरा