शासकीय पद भरतीत संगणक अर्हता सक्तीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:06+5:302021-02-09T04:16:06+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षेत दरवर्षी राज्यभरातील विविध शासनमान्य टंकलेखन संस्थेतून ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षेत दरवर्षी राज्यभरातील विविध शासनमान्य टंकलेखन संस्थेतून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. या संगणक टंकलेखन प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राला शासनाकडून संगणक अर्हता प्रदान केलेली असूनही काही विभागाच्या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये संगणक अर्हतेबाबत परिपूर्ण तपशील नमूद न केल्याची बाब निदर्शनाला आली होती. त्यामुळे संगणक टंकलेखनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र असूनही आवेदनपत्र भरताना अडचणी जात होत्या.
या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन संघटनेकडून शासनाने वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावर मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान विभागाकडून ५ फेब्रुवारी २०२१ ला अध्यादेश काढण्यात आला. परिपत्रकात राज्यभरातील शासकीय विभाग कार्यालय, महामंडळे, स्वायत संस्था, उपक्रम आदींच्या पदभरती जाहिरातीत शासनाने विहित केलेल्या संगणक अर्हतेबाबत परिपूर्ण तपशील नमूद करण्याच्या अनुषंगाने बंधनकारक करण्यात आले आहे.
कोट....
३०/४० मराठी व इंग्रजीचे संगणक टंकलेखन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार नव्हता. या अध्यादेशामुळे आता रोजगाराच्या संधी तरुणांना उपलब्ध झाल्या आहेत.
आनंद देवरे, आनंद कॅफे, मालेगाव