संगणक परिचालकांचा संप स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:39 PM2019-09-19T18:39:12+5:302019-09-19T18:40:21+5:30
महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करणे,मासिक वेतन पंधरा हजार मिळणे,14 वित्त आयोगातून वेतन न मिळता थेट राज्य शासनाकडून वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालाकांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन एक महिन्यानंतर म्हणजेच बुधवारी (दि.18) मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मानोरी : महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करणे,मासिक वेतन पंधरा हजार मिळणे,14 वित्त आयोगातून वेतन न मिळता थेट राज्य शासनाकडून वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालाकांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन एक महिन्यानंतर म्हणजेच बुधवारी (दि.18) मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील संगणक परिचालाकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळ समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रि या शासन दरबारी सुरु झालेली असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन महिने लागणार आहेत. शासनाच्या या आश्वासनानंतर संगणक परिचालाकांनी कामबंद आंदोलन माघे घेतले असून पुढील तीन महिन्यात शासन कोणत्या पद्धतीने अध्यादेश काढणार आहे हे बघणे गरजेचे असून सकारात्मक अध्यादेश निघाला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संगणक परिचालक संघटनेने दिला आहे.