अतिदुर्गम भागातील ७३ ग्रामपंचायतींची संगणकीय नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:41+5:302021-06-27T04:10:41+5:30
पेठ : पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त होणाऱ्या अनुदानांच्या वितरणासाठी राबविण्यात आलेल्या ई-स्वराज या संगणकीय प्रणालीत पेठ तालुक्याने १०० टक्के ...
पेठ : पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त होणाऱ्या अनुदानांच्या वितरणासाठी राबविण्यात आलेल्या ई-स्वराज या संगणकीय प्रणालीत पेठ तालुक्याने १०० टक्के ग्रामपंचायतींची नोंदणी पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पंचायत समिती यंत्रणेचे विशेष पत्रान्वये कौतुक केले आहे.
पेठ तालुक्यात एकूण ७३ ग्रामपंचायती असून अतिदुर्गम भाग असतानाही पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी सतत संपर्क करून सर्व लेखे संगणक आज्ञावलीत नोंदविण्याचे सर्वप्रथम काम पूर्ण केले. याबद्दल ग्रामसेवक संघटनेच्यावतीने गट विकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भूसावरे, विस्तार अधिकारी बापू सादवे, पांडुरंग पाडवी, तालुका व्यवस्थापक मनीष चौधरी आदींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष बी. आर. खंबाईत, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मगर यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.
--------------------
पेठ येथे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यासह ग्रामपंचायत विभागाच्या सत्कार प्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे सभासद उपस्थित होते. (२७ पेठ सातबारा)
===Photopath===
260621\26nsk_19_26062021_13.jpg
===Caption===
२७ पेठ सातबारा