कॉन्सन्ट्रेटर मशीनद्वारे केली रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:20+5:302021-05-25T04:16:20+5:30
सिन्नर : रोटरी क्लब, गोंदेश्वरच्या सदस्यांनी स्वखर्चातून तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेतली आहेत. तालुक्यातील ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची ...
सिन्नर : रोटरी क्लब, गोंदेश्वरच्या सदस्यांनी स्वखर्चातून तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेतली आहेत. तालुक्यातील ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्या बाधित रुग्णांना कुठलीही फी न घेता ही मशीन वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने ती गरजू रुग्णांना वरदान ठरत आहेत.
एक महिन्यापासून ही सेवा क्लबच्या माध्यमातून अविरत सुरु आहे. अनेक रुग्णांनी क्लबचे आभार मानले आहेत. एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती, त्यावेळेस क्लबच्या सदस्यांनी एकत्र येऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज तीनही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन रुग्णांच्या सेवेत आहेत. या उपक्रमाबद्दल क्लबचे अध्यक्ष महेश बोर्हाडे, सचिव अनिल गोर्डे व सर्व सदस्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. अनेक रुग्ण व नातेवाईकांनीही त्यांचे आभार मानले आहेत. तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन मशीन हवी असल्यास क्लबचे अध्यक्ष महेश बोर्हाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो...
स्वखर्चातून मशीन रुग्णांसाठी उपलब्ध
अनेक ठिकाणी क्लबतर्फे औषधे, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट दिले. पण ज्यावेळेस ऑक्सिजन मिळत नाही म्हणून रुग्ण दगावतात, असे समजल्यावर लगेचच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेऊन ती रुग्णांना वापरण्यास देण्याचे ठरवले. तीन मशीनसाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपयांची गरज होती. सामाजिक कामात तत्पर असलेल्या सर्व सदस्यांनी लगेचच ही रक्कम स्वतःच्या खिशातून क्लबला उपलब्ध करुन दिली.
फोटो ओळी- २४ सिन्नर रोटरी
सिन्नर येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसमवेत रोटरी क्लब, गोंदेश्वरचे अध्यक्ष महेश बोर्हाडे व पदाधिकारी.
===Photopath===
240521\24nsk_39_24052021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसमवेत रोटरी क्लब गोंदेश्वरचे अध्यक्ष महेश बोर्हाडे व पदाधिकारी.