सायकल चालविण्यासाठी लायसन्सची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:07 AM2019-11-14T00:07:32+5:302019-11-14T00:07:55+5:30

शहरातील इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थी दरवर्षी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एक प्रकल्प सादर करतात. यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ते अपघातांचे आव्हान असताना त्यांनी त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बालवयातच सायकल चालविण्याचे लायसन्स देण्याची संकल्पना मांडतानाच हे लायसन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन टेस्टही डिझाइन केली आहे.

 Concept of license for cycling | सायकल चालविण्यासाठी लायसन्सची संकल्पना

सायकल चालविण्यासाठी लायसन्सची संकल्पना

googlenewsNext

नाशिक : शहरातील इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थी दरवर्षी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एक प्रकल्प सादर करतात. यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ते अपघातांचे आव्हान असताना त्यांनी त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बालवयातच सायकल चालविण्याचे लायसन्स देण्याची संकल्पना मांडतानाच हे लायसन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन टेस्टही डिझाइन केली आहे.
भारतात दररोज दर चार मिनिटांत रस्ता अपघातामुळे एक मृत्यू होतो. तर भारतीय रस्त्यावर रोज सोळा मुले मृत्युमुखी पडतात. ही समस्या ओळखून विद्यार्थ्यांनी अपघातांचे सर्वेक्षण करून सखोल संशोधनानंतर अपघातांची वेगवेगळी कारणे शोधून काढली. यात रहदारीचे नियम न पाळणे हे कारण सर्वाधिक प्रकर्षणाने समोर आल्याने प्रत्येकाला रहदारी नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना दहापेक्षा जास्त अभिनव कल्पना मांडतानाच शाळेतील विद्यार्थ्यांना दोन महिने प्रत्यक्ष उपाययोजना करून निरीक्षण केले. त्यातून वाहतूक नियम लहानपणापासूनच शिकवावेत आणि शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असावा, असे मत विद्यार्थ्यांनी तयार केले. दुचाकी व मोटारसायकल चालवताना वाहतुकीचे नियम व व्यवहारिक अनुभवासाठी सायकल चालवतानाच त्या पाळल्या पाहिजेत. या कल्पनेवर शिक्कामोर्तब करीत वाहतुकीच्या नियमांसाठी अभ्यासक्रम आणि सायकल परवाना देण्यासाठी आॅनलाइन चाचणीची आखणी करून ७० टक्के गुण मिळविण्याऱ्या मुलांना सायकल परवाना देण्याची कल्पना मांडताना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी भारतातील सर्व विद्यार्थी लहानपणापासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली तर त्यांना रहदारीचे नियम पाळण्याची आणि रस्त्यावर सुरक्षित राहण्याची सवय होऊन अपघात नियंत्रित होऊन त्यात होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष या विद्यार्थ्यांनी नोंदविला आहे.
या संशोधनासाठी नाशिक विभागाचे परिवहन अधिकारी यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचीही विद्यार्थ्यांना मदत झाली.

Web Title:  Concept of license for cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.