रुग्ण वाढल्याने नागरिकांत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:32+5:302021-03-06T04:14:32+5:30
उद्यानामुळे वाढले परिसराचे वैभव नाशिक : जेलरोड परिसरात केंद्र शासनाच्या योजनेतून विकसित करण्यात आलेल्या उद्यानामुळे परिसराच्या वैभवात भर पडली ...
उद्यानामुळे वाढले परिसराचे वैभव
नाशिक : जेलरोड परिसरात केंद्र शासनाच्या योजनेतून विकसित करण्यात आलेल्या उद्यानामुळे परिसराच्या वैभवात भर पडली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
कॅनॉलरोडवरील पथदीप बंद
नाशिक :कॅनॉल रोडवरील अनेक पथदीप बंद असल्याने रात्रीच्यावेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. अंधारामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो यामुळे छोटे मोठे अपघात होऊन अनेकवेळा बाचाबाचीच्या घटना घडतात. येथील पथदीप दुरुस्त करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
नेहरुनगरमधील सदनिकांची दुरवस्था
नाशिक : नेहरु नगर परिसरात राहाणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे येथील सदनिकांची दुरवस्था झाली आहे. अनेक परिसरात गवत वाढले असून बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. या परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
शाळा पुन्हा बंद झाल्याने चिंता
नाशिक :शहरातील शाळा पुन्हा बंद झाल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण वर्ष मुलं घरीच राहिल्याने शाळा या वर्षी परीक्षा कशा घेणार आणि निकाल कसे लागणार याबाबत पालकांमध्ये चर्चा होत असून शिक्षण विभाग याबाबत काय निर्णय घेतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी
नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीने वाढील वीज बिल कमी करावे अशी मागणी त्रस्त ग्राहकांनी केली आहे. कोरोनाच्या काळात वीज बिल भरले नसल्यामुळे अनेकांचे थकबाकीचे आकडे वाढले आहेत ही वाढीव बिले भरताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
महागाई वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त
नाशिक : पेट्रोल , डिझेलचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे दर महिन्याचे किराणाचे बजेट वाढले आहे. यामुळे खर्च भागवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.