रद्दीचा भाव दुप्पट झाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 PM2020-12-26T16:14:27+5:302020-12-26T16:18:29+5:30

खडेगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील वर्षीपासून अडचणी सापडला असून दिवसो दिवस द्राक्ष शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून पुढील बाजार भावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वारेमाप वाढत आहे त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भाव चाळीस रुपये प्रती किलो झाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत रद्दीच्या भावात दुप्पटीने वाढ झाल्यांमुळे द्राक्ष उतपादक हातबल झाल्याचे दिसून येत आहे.

Concerns among grape growers over doubling of junk prices | रद्दीचा भाव दुप्पट झाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

रद्दीचा भाव दुप्पट झाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

Next

खडेगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील वर्षीपासून अडचणी सापडला असून दिवसो दिवस द्राक्ष शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून पुढील बाजार भावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वारेमाप वाढत आहे त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भाव चाळीस रुपये प्रती किलो झाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत रद्दीच्या भावात दुप्पटीने वाढ झाल्यांमुळे द्राक्ष उतपादक हातबल झाल्याचे दिसून येत आहे.
             करोनामुळे मागील द्राक्ष हंगाम संपूर्णपणे तोट्यात गेला काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पाच ते दहा किलोने मातीमोल भावात विकली तर काही शेतक-यांनी शेताच्या बांधावर खडून टाकली होती तर अनेक शेतक-यांना व्यापारी वर्गाने कवडीमोल भावात पैसे दिले आहे तरी द्राक्ष उत्पादक शेतकरी नव्या उमेदीने उभा राहून चालू हंगाम पार पाडण्याचा प्रयत्न करित आहे.

        त्यांत मुजराना पैसे हे रोख स्वरूपात द्यावे लागतात सध्या द्राक्षकामाची मजुरी वाढ झाली असून द्राक्ष घडांच्या थिनिंगसाठी एकरी १४ ते १५ हजार रुपये मजुरी दयावी लागत असून डिपिंगसाठी चार ते साडेचार हजार रुपये तर छाटणीचा खर्च पाच हजार रुपये त्याप्रमाणे अतिरिक्त मनी काढण्यासाठी सात ते आठ हजार एकरी मजुरी दयावी लागते द्राक्ष बागेत वर्षभर कामगती ही चालू असते त्यांमुळे द्राक्ष उत्पादकाला एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी ३० ते ३५ रुपये सध्या येत आहे.
सध्या बाजारामध्ये रासायनिक खताच्या किंमती मध्ये प्रंचड वाढ झाल्यामुळे ५० किलोच्या गोणीला १३०० ते १४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात तसेच किटकनाशक बुरसीनाशकाच्या किंमती गगनाला भिडल्या आहे डिपिंगचे एक औषध तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिलिटर आहे तर विदव्य खताची २५ किलोच्या गोणीची किंमती दोन हजारापासून तीन हजारापर्यत वाढलेली आहे.

               त्यांमुळे सध्या शेतक-यांना द्राक्ष शेताचा ताळमेळ लागत नाही आशी सर्व परिस्थिती असताना द्राक्षाचे घड झाकण्यासाठी लागण- यां रद्दीच्या भागात मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने भाव झाल्यांमुळे द्राक्षउत्पादक हतबळ झाल्यांचे दिसून येत आहे. त्यांत अजून करोनाची लस आलेली नाही आणि थोडयाच दिवसात द्राक्ष हंगाम सुरु होणार असल्यामुळे द्राक्षउत्पादकां मध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
प्रतिक्रिया...
करोनाची परिस्थिती असताना गेल्या ९ ते १० महिन्यापासून वर्तमानपत्राची छपाई अतिशय कमी प्रमाणात होत आहे त्यांमुळे बाजारामध्ये रद्दीचा तुटवडा निर्माण झाला आहे मात्र निर्यातक्षम द्राक्षबागाना घडाच्या सुरक्षितेसाठी तसेच गुणवत्ता व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पेपर लावणे आवश्यक आहे त्यांमुळे चालू वर्षी रद्दीचा खर्च वाढणार आहे
- सुनिल शिंदे ( द्राक्ष अभ्यासक नाशिक)

Web Title: Concerns among grape growers over doubling of junk prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.