येवल्यात बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:46 PM2020-05-06T21:46:57+5:302020-05-06T23:54:06+5:30

येवला : शहरासह तालुक्यात कोरोना-बाधितांची संख्या २५ झाली असून, बाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.

Concerns over the growing number of victims in Yeola | येवल्यात बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता

येवल्यात बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता

googlenewsNext

येवला : शहरासह तालुक्यात कोरोना-बाधितांची संख्या २५ झाली असून, बाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.
शहरात मालेगाव संपर्कातूून महिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबातील बाधितांची संख्या वाढू लागली मात्र सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला परिचारिका कोरोनाबाधित सिद्ध झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
या परिचारिकेच्या संपर्कातील कुटुंबासह पोलीस व सर्वच आरोग्य यंत्रणेचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३ अहवाल आले. यात पुन्हा एक उपजिल्हा रुग्णालयातील २७ वर्षीय महिला परिचारिका कोरोनाबाधित सिद्ध झाली.
तोपर्यंत येवला शहराची कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली होती. काल, रात्री उशिरा आलेल्या ३५ अहवालात १६ अहवाल कोरोनाबाधित आल्याने मात्र आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे धाबेच दणाणले तर शहरात मोठी खळबळ उडाली.

Web Title: Concerns over the growing number of victims in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक