राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:33 AM2019-07-27T00:33:59+5:302019-07-27T00:34:29+5:30
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रबद्ध केलेल्या हिट गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी दाद दिली.
नाशिक : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रबद्ध केलेल्या हिट गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी दाद दिली. या कार्यक्र मात उत्तरोत्तर रंगत येऊन गत आठवणीं उजाळा मिळाला. निमित्त होते, बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्वर्गीय गायक राजेश खन्ना स्मृतिदिनाचे.
इंदिरानगर येथील स्वर्णिम सभागृह येथे नितीनकुमार प्रेझेंट्स कार्यक्र माचा शुभारंभ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आबा पाटील यांनी केले. स्वागत आयोजक नितीन कुमार यांनी केले. यावेळी नवोदित हौशी कलाकारांनी जिंदगी का सफर, ये श्याम मस्तानी, आप के अनुरोध, आते जाते खुबसुरत, अच्छा तो हम चलते हैं, रूप तेरा मस्ताना, ये क्या हुआ कैसे हुआ आदी गीते सागर उगले, राजेश बागुल, रिया बागुल, स्नेहल कुलकर्णी, राजेश ढगे, अतुल गांगुर्डे आदींनी सादर करत कार्यक्र मात रंगत आली कार्यक्र माची सांगता हाथी मेरे साथीमधील नफरत की दुनिया को या गीताने अमित गुरव यांनी केले.
कार्यक्र माचे निवेदन उस्मान पटणी यांनी बाबू मोशाय. जिंदगी और मौत उपर वाले के हाथ में है जहांपनाह. जिसे ना आप बदल सकते है ना मै. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवाले की उगलिया में बांधी है. कौन ,कब कैसे उठेगा कोई नहीं बता सकता या अनोख्या शैलीत करून राजेश खन्ना स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन समारोप केला.