कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:04+5:302021-07-15T04:12:04+5:30

मालेगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर ...

Concession in fees for students of agricultural courses | कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत

Next

मालेगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषी मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णयही भुसे यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी व परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर. चारही विद्यापीठांचे कुलगुरू अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच अधिष्ठाता समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक फरांदे आदी उपस्थित होते.

--------------------

विविध बाबींवर खर्च

या बैठकीत अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता, मदत कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुणपत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्या बाबीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सुट देण्यात यावी.

----------------

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा निर्णय घेताना कृषी मंत्री दादा भुसेंसमवेत कृषिसचिव एकनाथ डवले. (१४ मालेगाव १)

140721\14nsk_10_14072021_13.jpg

१४ मालेगाव १

Web Title: Concession in fees for students of agricultural courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.