वीज देयके  दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी ; ग्राहकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:11 PM2020-06-19T14:11:49+5:302020-06-19T14:15:18+5:30

लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला आहे. 

Concession to pay electricity bills in two stages; Customer demand | वीज देयके  दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी ; ग्राहकांची मागणी 

वीज देयके  दोन टप्प्यात भरण्याची सवलत द्यावी ; ग्राहकांची मागणी 

Next
ठळक मुद्दे ग्राहकांची विजबिलात सवलत देण्याची मागणी दोन टप्प्यात बील भरण्याची सवलत मिळावीलॉगकाऊनमुळे सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जात असतानाच महावितरणकडून गेल्या तीन महिन्यानंतर वीज देयके वाटप करण्यात येत आहे. परंतु गत तीन महिन्यात लॉकाऊनमुळे अनेकांचे उद्योगधंदे प्रभावित झाले असून अनेकांंना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर वीज बीलांची देयके कशी अदा करायची असा प्रश्न ग्राहकांसमोर निमार्ण झाला असून वीज देयके अदा करणे अडचणीचे होत असल्याने महावितरणकडून दोन टप्प्यात वीजबीलांची देयके अदा करण्याची सवलत द्यावी अशी मागणी नाशिकरांकडून होत आहे. 
सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत दोन महिन्यात कडेकोट लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे नोकरदार वर्गातील अनेक नागरिकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदेही लॉकडाऊनमुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आथिर्क अडचणींचा सामना करावा लागत अशा परिस्थितीतच महावितरणने वीज बीलांचे वितरण करून देयके अदा करण्याचे आवाहन करीत वसुलीला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे महावितरणने गेल्या दोन महिन्यांत सरासरी वीजबीलांचे वितरण केले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यात वीज देयके भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. 

Web Title: Concession to pay electricity bills in two stages; Customer demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.