शहरातील वयोवृद्ध पोलिसांना बंदोबस्तापासून सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:57 PM2020-05-04T21:57:56+5:302020-05-04T22:57:00+5:30
नाशिक : साठीच्या समीप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता मुंबईपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त न करता, त्यांना गर्दीपासून ‘सुरक्षित’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

५५ पेक्षा अधिक वय असणाºया पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर अशा पोलीस सेवकांना कर्तव्यापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यापाठोपाठ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयाच्या ५५ वर्षांवरील सुमारे १२५ कर्मचाºयांना गर्दीपासून कोसो दूर ठेवत बंदोबस्तासाठी नियुक्ती न देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे
आयुक्तालयात नांगरे पाटील यांनी डिस्टन्स पाळत बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. जिल्ह्यात मालेगावमध्ये तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, या सर्वांचे वय किमान ५० वर्षांपुढील आहे. नाशिकमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पोलीस सेवकांची संख्या मोठी आहे. शहर पोलीस दलात साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. त्यात १२५ पोलीस सेवक हे ५५ वर्षांच्या पुढील आहेत. नाशिकमध्ये मुंबईप्रमाणे स्थिती नाही. त्यामुळे या कर्मचाºयांना गर्दीची ठिकाणे टाळून नियुक्ती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबरोबर नियंत्रण कक्षाद्वारे दररोज विभाग प्रमुखांना कॉल करून त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाºयांच्या आरोग्याची माहितीदेखील संकलित करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कर्मचारी माहिती लागलीच वरिष्ठांना उपलब्ध होणार आहे.
---
सेवकांना दिली विश्रांती
कोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाºयांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी थेट ५५ वर्षांवरील सेवकांना कोरोना काळात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.