रंगतदार कार्यक्रमाने ऋतुरंग महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:10 AM2018-01-30T01:10:46+5:302018-01-30T01:11:08+5:30
ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यांनी सादर केली. पारंपरिक सरगम बंदीश, ठुमरी, विविध हिंदी-मराठी गाण्यांचा मिलाफ असलेली मेलडी बंदीश पेश करण्यात आली.
नाशिकरोड : ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यांनी सादर केली. पारंपरिक सरगम बंदीश, ठुमरी, विविध हिंदी-मराठी गाण्यांचा मिलाफ असलेली मेलडी बंदीश पेश करण्यात आली. सदर कार्यक्रमाची संकल्पना सुनील देशपांडे व विवेक गरूड यांची होती. दिग्दर्शन व सादरीकरण विद्या देशपांडे व मकरंद हिंगणे, निवेदन सुनील देशपांडे यांनी केले. यामध्ये कलावंत गायक- सुखदा बेहेरे दीक्षित, हर्षद वडजे, श्रुती बोरसे, तबला व्यंकटेश तांब, की-बोर्ड आनंद अत्रे, गिटार कृष्णप्रसाद, पखवाज दिगंबर सोनवणे, सितार डॉ. उद्धव अष्टुरकर आदी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या दुसºया पर्वात कीर्तन ते फ्युजन, नर्तन अभिरंग कथ्थक नृत्य प्रवास हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये श्रीकृष्णाला भावलेला कथ्थक नृत्यप्रकार, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत मुगलेआझम ते बाजीराव बस्तानीपर्यंतच्या कथ्थकचा प्रवास विविध विषय व पदन्यासातून विद्या देशपांडे व त्यांच्या सहकलाकारांनी सादर केला. संगीत संयोजन सुनील देशपांडे यांचे होते. यामध्ये कलावंत शुभांगी साळवे, नूपुर जोशी, श्वेता चंद्रात्रे, अनुष्का घुगे, अनुष्का बोरकर, मिताली काळे, इशा निकम, निधी नायर, रागिणी कुलकर्णी, प्रज्वल धनवड, मैथिली ढोके, एकता दीक्षित, सर्वाक्षी कुलकर्णी, तेजस्विनी भावे, मेघना भुजबळ, सई बापट, प्रचिती खरे, संपदा मुंदडा यांनी नृत्याविष्कार सादर केले. ऋतुरंग महोत्सवाच्या समारोपानिमित्त कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आभार तन्वी अमित यांनी मानले. यावेळी रसिक उपस्थित होते.