्नराज्यस्तरीय फि ल्ड अर्चरी स्पर्धेत पुणे अजिंक्य स्पर्धांचा समारोप

By admin | Published: October 10, 2014 11:14 PM2014-10-10T23:14:42+5:302014-10-10T23:15:53+5:30

नराज्यस्तरीय फि ल्ड अर्चरी स्पर्धेत पुणे अजिंक्य स्पर्धांचा समारोप

The concluding Pune edition of the competition in State level Archery | ्नराज्यस्तरीय फि ल्ड अर्चरी स्पर्धेत पुणे अजिंक्य स्पर्धांचा समारोप

्नराज्यस्तरीय फि ल्ड अर्चरी स्पर्धेत पुणे अजिंक्य स्पर्धांचा समारोप

Next

 नाशिक : राज्यस्तरीय शालेय फिल्ड अर्चरी क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवत पुण्याच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले़ शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे गेल्या दोन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या़ यामध्ये नाशिक विभागासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती या विभागातील १९० खेळाडूंनी सहभाग नोंदवला़ पुणे व मुंबईच्या खेळाडूंनी स्पर्धेवर प्रथमपासून वर्चस्व राखले़ यजमान नाशिकचे खेळाडू मात्र पूर्णत: अपयशी ठरले़ या स्पर्धेत प्रथम चार क्रमांक मिळविणारे खेळाडू याप्रमाणे - मुले - इंडियन प्रकार - सुनील अनपट (पुणे), रोहित पाटील (मुंबई), प्रणय गायकवाड (पुणे)़ रिकव्हर प्रकार - तन्मय मालुसरे (पुणे), सुकमनी बाबरेकर(अमरावती), अलोक गुरव (मुंबई), भगवान ढवळे (औरंगाबाद)़ कंपाउंड प्रकार - पुष्कराज गोखले (मुंबई), तनिष लुल्ला (पुणे), ऋतुराज पाटील (मुंबई) मुली - इंडियन प्रकार - अमिता जाधव, श्रद्धा पोवार, अमिषा पाटील, शिवाणी पाटील (सर्व कोल्हापूर). रिकव्हर प्रकार - मुस्कान बिष्णोई (पुणे), पूर्वा पालिवाल (अमरावती), ईश्वरी चव्हाण (मुंबई), अवनती काळकोंडे (अमरावती)़ कंपाउंड प्रकार - स्रेहा ननावरे (पुणे), अनुजा महालक्ष्मी (अमरावती), मेघा अगरवाल (पुणे), दीपाली पाटील (पुणे) आदि़ या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़

Web Title: The concluding Pune edition of the competition in State level Archery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.