सिंधी बांधवांच्या चालिहा व्रताचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:41 PM2020-08-22T22:41:25+5:302020-08-23T00:16:31+5:30
देवळाली कॅम्प : भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदी पात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पूज्य चालिहा या व्रताचा समारोप करण्यात आला.
चालिहा व्रताच्या समारोपप्रसंगी पूजाविधी करताना सिंधी बांधव.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदी पात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पूज्य
चालिहा या व्रताचा समारोप करण्यात आला.
यावर्षी असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेत पूज्य दरया शाह संगत ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पाडले. त्यानंतर येथील झुलेलाल मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या वीस मटकी व पूज्य बेहराणा घेत संसरी येथील दारणा नदीपात्रात मनोभावे जल व ज्योत पूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर ज्योत प्रवहन व मटकीचे प्रवहन करण्यात येऊन व्रताची सांगता आली. त्यानंतर गेले ४० दिवस व्रत करणाºया सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जान्हवे देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पुजारी घनशाम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढीत व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत आशीर्वाद दिला. याप्रसंगी उपस्थितांना गोड शिरा व चन्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया, पूज्य दरÞया शाह संगत ट्रस्टचे मोहन सचदेव, अमित रोहेरा, आनंद कुकरेजा, मुलचंद देहलानी, हसाराम सिंगानी, अशोक पेशवानी, रेशमा रामसिंगांनी, रेणू सचदेव आदी सिंधी बांधव उपस्थित होते.रक्षासूत्र व जान्हवे काढलेयेथील झुलेलाल मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या वीस मटकी व पूज्य बेहराणा घेत संसरी येथील दारणा नदीपात्रात मनोभावे जल व ज्योत पूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर ज्योत प्रवहन व मटकीचे प्रवहन करण्यात येऊन व्रताची सांगता आली. त्यानंतर गेले ४० दिवस व्रत करणाºया सिंधी बांधवांनी रक्षासूत्र व जान्हवे विधियुक्त मार्गाने काढले.