युवा प्रेरणा शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:52 PM2018-10-18T17:52:07+5:302018-10-18T17:52:21+5:30

जळगाव निं. : येथील अहिल्यादेवी गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगावतर्फे महाविद्यालयीन युवकांसाठी एक दिवसीय युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

The concluding Youth Inspiration Camp | युवा प्रेरणा शिबिर संपन्न

युवा प्रेरणा शिबिर संपन्न

Next

जळगाव निं. : येथील अहिल्यादेवी गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगावतर्फे महाविद्यालयीन युवकांसाठी एक दिवसीय युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात बौद्धीक सत्र - हेतूपूर्ण जीवन नेतृत्व विकास, युवकांपुढील आव्हाने व त्यावर प्रतिसाद, व्यवहारात देशभक्ती यावर गटचर्चा तसेच केंद्राचा परिचय, गाणे, खेळ, घोषणा, आज्ञाअभ्यास, भोजनमंत्र, अभिनय गीत, योगासने, सूर्यनमस्कार आदि उपक्रम घेण्यात आले.
केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, भगिनी निवेदिता यांचे अल्पचरित्र असलेल्या ‘प्रेरणादिन’ या पुरस्तकावर आधारित बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची भारतीय संस्कृती परिक्षा घेण्यात आली. २१२ विद्यार्थ्यांनी सदर परिक्षा दिली होती. यात शीतल सापनर, हर्षद शिलावट, ताई कोरे, नेहा काळे व गोरख कोरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विवेकानंदांची पुस्तके, प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
शिबिरास मधुकर देशपांडे,श्रीमती शोभा श्रोत्री,प्राचार्य संजय पाठक, प्राचार्य नितीन हिरे, वैभव ढगे, अंकुश आहेर, प्रसाद दिवटे, गणेश हलवर, ज्योती कोरे, हर्षदिप आहिरे, पर्यवेक्षक जी. एल. पारखे, डी. व्ही. चांडोले, प्रा. पी. जी. माने, प्रा. एस. टी. जाधव, पी. यु. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे, प्रा. अमोल अहिरे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अहिरे यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानले.

 

Web Title: The concluding Youth Inspiration Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.