पाथरेत कोरोना जनजागृती कार्यक्रमाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:58 PM2020-08-29T23:58:00+5:302020-08-30T01:21:20+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नोकियाच्या अर्थसहाय्याने व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ आणि ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अॅण्ड अॅक्टिव्हिटीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्गजन्य आजाराची जनजागृतीची सांगता करण्यात आली.

सद्या कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यावर मात करण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या व्यवस्थापक ईप्सिता दास, सीवायडीएचे संचालक प्रवीण जाधव तसेच सिन्नर तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव याच्या मार्गदर्शनातून तालुक्यातील पाथरे येथे कोविड-१९ जनजागृती अभियान सप्ताहाची सांगता करण्यात आली. दिनांक १५ ते २१ आॅगस्टदमम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहयोगातून तसेच सीवायडीए संस्थेमार्फत तालुक्यातील २० गावांमध्ये कोरोनासंदर्भात गाण्याच्या माध्यमातून हात धुण्याचे प्रशिक्षणातून प्रबोधन करण्यात आले. १५ आॅगस्ट या दिवशी रथाचा प्रारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी सहाय्यक व्यवस्थापक धनंजय दिघे, सीवायडीए संस्थेचे प्रकल्प समन्वयक योगेश नेरपगार, निकिता जंगम, विकास मस्के, भाऊसाहेब शेळके, हर्षदा हिंडे यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ग्रामस्थ सामाजिक दुरी ठेवून, मास्क वापरून उपस्थित होते.