शेवगे येथे कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:57+5:302021-07-02T04:10:57+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक यादवराव झांबरे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती ...

Conclusion of Krishi Sanjeevani Week at Shevge | शेवगे येथे कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता

शेवगे येथे कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक यादवराव झांबरे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन, अशोक झांबरे उपस्थित होते. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत वास्ते व विस्ताराधिकारी किरण मोरे यांनी पंचायत समिती कृषी विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी जनार्दन शिरसागर यांनी कृषी संजीवनी सप्ताह काळात संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी लक्ष्मण निगळ, साईनाथ कालेकर, सोमनाथ काळे, लक्ष्मण मलिक, कानिफनाथ सोनार, राहुल जगताप, सुनीता कडनोर, सविता तांबे, अनुपमा पाटील, राम निंबाळकर, स्वप्निल नागरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन भास्कर नाईकवाडी यांनी केले.

----------------------

येवला तालुक्यातील शेवगे येथे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह सांगताप्रसंगी छत्री वाटपप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, कृषी अधिकारी कारभारी नवले, ज्येष्ठ नागरिक यादवराव झांबरे, हरिभाऊ महाजन, साईनाथ कालेकर आदी. (०१ जळगाव नेऊर)

010721\01nsk_13_01072021_13.jpg

०१ जळगाव नेऊर

Web Title: Conclusion of Krishi Sanjeevani Week at Shevge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.