वडेल ग्रामपंचायतीतर्फे रस्त्यांचे काँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:13+5:302021-01-09T04:11:13+5:30
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वडेल ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता असून, शिवसेनाप्रणित वडेल विकास पॅनल माजी जि. प. ...
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वडेल ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता असून, शिवसेनाप्रणित वडेल विकास पॅनल माजी जि. प. सदस्य डॉ. यशवंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरले आहे. नरेंद्र लोटन सोनवणे हे विद्यमान सरपंच आहेत. वडेल ग्रामपंचायतीत ५ हजार ८१६ मतदार आहेत. वडेल विकास पॅनलकडून वॉर्ड क्रमांक १ मध्ये नरेंद्र लोटन सोनवणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), रामचंद्र गोकुळ शेलार (सर्वसाधारण), प्रमिला ताराचंद महाले (सर्वसाधारण स्त्री), वॉर्ड क्रमांक २ मधून युवराज सुभाष जाधव (अनुसूचित जाती), नामदेव रंगनाथ माळी (अनु.जमाती), मीराबाई धोंडू जाधव (अनु.जमाती स्त्री), वाॅर्ड क्रमांक ३ मधून रंजना साहेबराव मोरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), जिजाबाई छगन वाघ (सर्वसाधारण), वाॅर्ड क्रमांक ४ मधून तुषार बन्सीलाल सोनवणे (नामाप्र), नानाभाऊ फुला शेलार (सर्वसाधारण), लता रमेश खैरनार (सर्वसाधारण स्त्री) तर वॉर्ड क्रमांक ५ मधून योगेश दादाजी सावळे (सर्वसाधारण), हौसाबाई बन्सीलाल बोरसे (नामाप्र), मंगलबाई शांतीलाल शेलार (सर्वसाधारण) हे उमेदवारी करीत आहेत. सरपंच सोनवणे यांच्या कार्यकाळात वडेल चौपाटीवर व अमरधाम येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. काँक्रीटचे रस्ते, स्त्री शौचालय, अमरधाममध्ये ओट्यांचे नूतनीकरण करुन शेडचे पत्रे बदलण्यात आले. गावातील कमानीला रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आले. आमदार निधीतून सभा मंडप उभारले. मराठी शाळेला संरक्षक जाळी बसविली. आदिवासी वस्तीत सभा मंडप, व्यायाम शाळा उभारून त्यास साहित्य पुरविले. दाळम्या वस्ती व नंदा गवळी चौकात काँक्रिटीकरण केले. जलशुद्धीकरण यंत्र बसविले. इंदिरानगर आरोग्य केंद्रासमोर काँक्रिटीकरण केले. कोरोना काळात पॅनलचे नेते डॉ.यशवंत सोनवणे यांनी ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरविली. आदिवासी वस्तीत हायमास्ट बसविले. श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला. २०० बांधकाम कामगारांना कामगार विम्यासहीत बांधकाम साहित्य मिळवून दिले. १५ वर्षांपासून प्रलंबित राम मंदिर बांधकामाचा प्रश्न सोडविला.
----------------
पॅनलतर्फे गावात सर्व समाजासाठी मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देणे. गाव डासमुक्त होण्यासाठी भूमिगत गटारी करणे. शाळांना संगणक देऊन डिजिटलायझेशन करणे.
------------------
सत्ता असताना सरपंच पदाच्या गेल्या ५ वर्षांच्या काळात भरीव अशी विकास कामे केली असून, भविष्यातील विकासाच्या मुद्द्यावर सर्व समाजांना बरोबर घेऊन निवडणुकीस सामोरे जात आहोत. या काळात प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यात येतील.
- नरेंद्र सोनवणे
===Photopath===
080121\08nsk_8_08012021_13.jpg
===Caption===
पॅनल प्रमुख - नरेंद्र सोनवणे