केटीएचएम उड्डाणपुलाखाली कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:49+5:302021-03-09T04:17:49+5:30
मेहेर सिग्नलवर वाहतूक विस्कळीत नाशिक : मेहेर चौकातून गोळे कॉलनीत जाणाऱ्या वाहनधारकांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. मेहेर सिग्नल चौकात ...
मेहेर सिग्नलवर वाहतूक विस्कळीत
नाशिक : मेहेर चौकातून गोळे कॉलनीत जाणाऱ्या वाहनधारकांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. मेहेर सिग्नल चौकात थांबलेली वाहने अनेकदा सिग्नलचा नियम तोडून मेहेर हॉटेल शेजारील रस्त्याने जात असल्याने सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांचा गोंधळ उडतो. या चौकातू वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जुन्या सीबीएस समोरील कोंडी कायम
नाशिक : जुने सीबीएसमधून निघणाऱ्या बसेस सीबीएस सिग्नलकडे वळण घेत असताना समोरून येणाऱ्या वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. बसेसचा लांबलचक आकार आणि वळण घेताना व्यापला जाणारा रस्ता यामुळे शरणपूररोडकडून येणाऱ्या वाहनधारकांना कोंडीत अडकून पडावे लागते. त्यातच ठक्कर बझारकडून येणाऱ्या रिक्षाचालकांचीही भर पडते.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडले
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे प्रमुख प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सध्या हे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्याशेजारील द्वार उघडण्यात आले असून प्रांत कार्यालयाकडे जाणारे जुने प्रवेशद्वारदेखील उघडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची सोय झाली आहे.