नाशिकमधील सहकारी बँकांची स्थिती उत्तमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:46+5:302021-03-19T04:13:46+5:30

शहरातील एका नागरी सहकारी बँकेवर अशाच प्रकारे पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. संबंधित ...

The condition of co-operative banks in Nashik is excellent | नाशिकमधील सहकारी बँकांची स्थिती उत्तमच

नाशिकमधील सहकारी बँकांची स्थिती उत्तमच

Next

शहरातील एका नागरी सहकारी बँकेवर अशाच प्रकारे पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. संबंधित बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारे आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्राहक पंचायतीच्या गुंतवणूक फोरमचे अध्यक्ष ॲड. श्रीधर व्यवहारे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, महानगरप्रमुख प्रकाश जोशी, महानगर सहसचिव संदीप नगरकर, ॲड. समीर शिंदे, उल्हास शिरसाट यांनी नुकतीच खरे यांची भेट घेतली. यावेळी अनेक बँकांवर पालक अधिकारी नियुक्त केल्याने सभासद हवालदिल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्रीधर व्यवहारे यांनी माहिती विचारली असता त्यांनी मार्चअखेरपर्यंत एनपीए वाढू नये, यासाठी काही बँकांवर पालक अधिकारी नियुक्त केल्याचे सांगितले. सुधाकर काटकर यांनी यावेळी बँकांमध्ये एनपीएचा फलक दिसत नाही, याकडे लक्ष वेधल्यानंतर खरे यांनी यासंदर्भात कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: The condition of co-operative banks in Nashik is excellent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.