भगुर स्मशानभूमीतील शवदाहिनीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:47+5:302021-03-14T04:14:47+5:30
सन १९९६ मध्ये डॉ. जे.सी. लकारिया परिवाराने नवीन सुसज्ज स्मशानभूमी बांधून भगुर नगरपालिकेकडे सुपूर्द केली. त्यानंतर नगरपालिकेने दोनपैकी एक ...
सन १९९६ मध्ये डॉ. जे.सी. लकारिया परिवाराने नवीन सुसज्ज स्मशानभूमी बांधून भगुर नगरपालिकेकडे सुपूर्द केली. त्यानंतर नगरपालिकेने दोनपैकी एक शवदाहिनी काही महिन्यापूर्वी नवीन बसवली. मात्र दुसरी अतिशय खराब झाली आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक मृतदेह आल्यास एकावर जमिनीवरच अंत्यसंस्कार करावे लागतात. स्मशानभूमीसाठी यापूर्वी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती व त्यासाठी खोलीही बांधण्यात आली. परंतु सुरक्षा रक्षक नसल्याने सध्या ही खोली रिकामी आहे. नगरपालिकेने स्मशानभूमी कामासाठी कर्मचारी नियुक्त करून मृत्यू नोंदणीची सोय तसेच स्मशानभूमीची देखभाल करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजय वाहणे, माजी नगरसेवक नरेंद्र गायकवाड, प्रदीप साळवे, विलास भवार, सुनील साळवे, संतोष भालेराव यांनी केली आहे.
(फोटो १३ भगुर)