रस्त्यावरील वाहनांमुळे कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:17 AM2019-12-31T01:17:25+5:302019-12-31T01:17:41+5:30
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमारे सतरा वर्षांपूर्वी दोन टप्प्यात वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्र मण विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच वाहनांवर नियंत्रण रहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. रस्ता झाल्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे वाटले होते, परंतु काही दिवसांतच ते दिव्य स्वप्नच राहिले. कारण की वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये असून त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन्तास लहान आणि मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वेळेस संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी उलटसुलट चर्चा करीत आहे
वाहनतळाची व्यवस्था नाही
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नासर्डी नदी पुलालगत, अमृत वर्षा कॉलनी व वनवैभव कॉलनी या ठिकाणी समोरासमोर लॉन्स व मंगल कार्यालय असल्याने विवाह समारंभाच्या दिवशी रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांमुळे जणूकाही वाहतुकीस रस्ता बंद केला जातो. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना कशी परवानगी दिली, असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावरून पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना लॉन्स व मंगल कार्यालयांना परवानगी दिली
कशी ? असा प्रश्न वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पडला आहे.
- अशोक लोळगे, रहिवासी