कोनांबे पूरचारीचे काम सुरू झाल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:42 PM2018-11-30T17:42:31+5:302018-11-30T17:42:42+5:30
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथील पूरचारीचे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू करण्यात आले आहे.
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथील पूरचारीचे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू करण्यात आले आहे. या पूरचारीचा फायदा तालुक्यातील मनेगाव येथील शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर होणार असून, त्यांची मागणी मान्य करून पूरचारीचे काम सुरू केल्याबद्दल मनेगाव येथील जय हरी ज्येष्ठ नागरिक संघ व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांकडून आमदार वाजे यांना आभारपत्र देण्यात येऊन पत्रात आपण लोकप्रतिनिधीची सूत्रे स्वीकारल्यानंतर आजपर्यंत विकासाची व जनहिताची अनेक भरीव कामे मार्गी लावली. शेतकºयांचे व कामगारांचे प्रश्न सामंजस्याने सोडविले, तसेच तळागाळातील लोकांना मदतीचा हात दिला. शेतकºयांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलात. कोनांबे पूरचारीचा बºयाच वर्षांपासून दुर्लक्षित, रेंगाळलेला तसेच विरोध असलेला प्रश्न आपण कार्यकुशलतेने मार्गी लावला, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे म्हटले आहे. यावेळी परशराम सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाजीराव सोनवणे, मधुकर पवार, अॅड. संजय सोनवणे, एम.आर. शिंदे, सोपान सोनवणे, योगेश घोटेकर, अण्णासाहेब कर्डक, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
फोटो क्र.- 29२्रल्लस्रँ06
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने कोनांबे पूरचारीचे काम मार्गी लागल्याबद्दल आमदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी परशराम सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाजीराव सोनवणे, मधुकर पवार, अॅड. संजय सोनवणे, एम. आर. शिंदे, सोपान सोनवणे, योगेश घोटेकर आदी.