संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:35 PM2017-11-22T23:35:46+5:302017-11-23T00:40:50+5:30

प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली.

Confessions of officials from angry corporators | संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी

संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी

Next
ठळक मुद्देतुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार सातपूर विभागाची प्रभाग सभा विविध विषयांवर अधिकाºयांना धारेवर धरले.

सातपूर : प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली.  ़़प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर विभागाची प्रभाग सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला अधिकाºयांनी उद्या माहिती देतो असे सांगत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले होते. यात भागवत आरोटे, संतोष गायकवाड, दीक्षा लोंढे, रवींद्र धिवरे, नयना गांगुर्डे, पल्लवी पाटील, योगेश शेवरे, डॉ. वर्षा भालेराव, राधा बेंडकोळी आदींनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. उघड्यावरील मांस विक्री, मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, घंटागाडी, पथदीप, उद्यानांची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी, साफसफाई, अतिक्रमणे आदींसह विविध विषयांवर नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांनी ओळखपत्र लावलेच पाहिजे अन्यथा कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.  शिवाय सदस्यांचा सन्मान राखण्यात यावा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत अशी सक्त ताकीद यावेळी प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी दिली. सभेला गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिले. 
...अन्यथा आंदोलन 
सातपूर-अंबड लिंकरोडवरील रसायनयुक्त भंगार साहित्य मनपाच्या क्लब हाउसच्या मैदानावर आणून टाकले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वत्र बकालपणा आलेला आहे. हे भंगार साहित्य त्वरित हटवून साफसफाई करण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक दीक्षा लोंढे यांनी यावेळी दिला.

Web Title: Confessions of officials from angry corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.